मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून टपाल मतपत्रिकांची मोजणी सकाळी आठ वाजता, तर ‘ईव्हीएम’ यंत्रांवरील मतांची मोजणी सकाळी साडेआठ वाजता सुरू होईल. प्रत्येक विधानसभेसाठी एक अशा २८८ मतदारसंघांसाठी २८८ मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तर मुंबईत १० ठिकाणी मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
मतमोजणी निरीक्षक आणि उपस्थित उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्यासमोर सीलबंद ‘स्ट्राँगरूम’ उघडण्यात येतील आणि ईव्हीएम यंत्रे मतमोजणी केंद्रांवर नेण्यात येतील. मतमोजणी केंद्रातील सर्व कार्यवाही सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे चित्रित केली जाणार आहे. राज्यभरात ईव्हीएम यंत्रांची सुरक्षितता व मतमोजणी प्रक्रियेसाठी कडेकोट पोलीस सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> नांदेडमध्ये ‘विक्रमादित्य’ कोण, उत्कंठा शिगेला!
राज्यात ८५ वर्षांहून अधिक वय असलेल्या सुमारे ६८ हजार ज्येष्ठ नागरिकांनी आणि १२ हजाराहून अधिक दिव्यांग मतदारांनी निवडणूक आयोगाने पुरविलेल्या गृह मतदान सुविधेचा लाभ घेतला. निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन त्यांना ही सुविधा पुरविली. अत्यावश्यक सेवेतील ३६ हजाराहून अधिक मतदारांनी टपाल मतदान केले. तर चार लाख ६६ हजार ८२३ मतपत्रिका निवडणूक कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
मुंबईत १० ठिकाणी मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली असून, सर्वत्र आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी सांगितले. यादव यांनी या मतमोजणी केंद्रांना भेट देऊन सर्व बाबींचा आढावा घेतला व मतमोजणी प्रक्रियेबाबत सूचना दिल्या.
ठाणे जिल्ह्यात १८ ठिकाणी मतमोजणी
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत बुधवारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. आता जिल्हा प्रशासन मतमोजणी प्रक्रियेसाठी सज्जता ठेवली आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी प्रक्रिया ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघातच होणार आहे. त्यायासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.