माजी मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित दापोली येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याच्या प्रकियेला सोमवार (२९ ऑगस्ट) सुरुवात झाली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुरुडमधील वादग्रस्त रिसॉर्ट तोडण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे शासनाने घालून दिलेल्या विहीत नियमावलीनुसार शासकीय पद्धतीने ही कारवाई पूर्ण केली जाईल. कार्यवाही करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. बांधकाम विभाग त्यासाठी लवकरच एजन्सी नियुक्त करणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. दरम्यान, रिसॉर्ट तोडण्यासाठी पावले उचलली जात असली तरीही त्यासाठी किती वेळ लागेल याबाबत निश्चित कालावधी स्पष्ट झालेला नाही.

महाराष्ट्र किनारपट्टी विभागीय व्यवस्थापन प्राधिकरणाला ( महाराष्ट्र कोस्टल झोनल मॅनेजमेंट अ‍थॉरिटी) केंद्र गेल्या सरकारने २२ ऑगस्ट रोजी दापोलीतील साई रिसॉर्ट आणि सी कौंच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश दिले . त्यानुसार या प्राधिकरणाची जिल्हास्तरीय समिती आणि टास्क फोर्सची   जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. यावेळी पोलीस यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, जिल्हा परिषद ग्रामविकास विभागासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. 

दापोलीतील साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यासंदर्भात कागदपत्रेही प्रशासनाला पुरवली होती. हे रिसॉर्ट पाडण्यासाठी केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला होता. त्यानुसार रिसॉर्ट पाडण्याचे आदेश केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Administration started the process of taking action against anil parabs resort print politics news pkd