चंद्रशेखर बोबडे

नागपूर : काँग्रेस, भाजप पुन्हा काँग्रेस असा प्रवास केलेल्या आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्यावर ते पुन्हा भाजपमध्ये जाणार का, अशी चर्चा रंगली आहे. मात्र देशमुख यांचा पद्धतशीरपणे वापर करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे आशिष देशमुख हे पुत्र. राजकीय धडे त्यांनी काँग्रेसमध्ये गिरविले. मग भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार म्हणून निवडून आले. पक्षात पटले नाही म्हणून आमदारकीचा राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण तेथेही अन्य कोणाशी फारसे पटले नाही. आता पुन्हा भाजपचा मार्ग पत्करतील अशी चिन्हे आहेत.

Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
nashik BJP rebels girish mahajan
बंडखोरांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश अवघड
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
bjp and ajit pawar ncp political conflict over allegations against dhananjay munde
धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे सुरेश धस, चित्रा वाघ यांचा बोलविता धनी कोण ?
Setback to Sena (UBT) in Pune 5 ex corporators of party set to join BJP
पाच माजी नगरसेवक करणार मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश; पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का

देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास नागपूरमध्ये खुद्द फडणवीस यांच्या मतदारसंघात भाजपपासून दुरावलेल्या कुणबी-मराठा मतदारांना जवळ करता येणार आहे तर जिल्ह्यात सावनेरमध्ये काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यापुढे प्रबळ आव्हान उभे करता येणार आहे. काटोलमधून देशमुख एकदा विजयी झाल्याने या मतदारसंघात ते राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्यापुढे अडचणी निर्माण करू शकणार आहे. त्यामुळे सध्यातरी देशमुखांची हकालपट्टी ही भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… जालन्याचे महानगरपालिकेत रुपांतर करण्यावरून काँग्रेस व शिंदे गटात जुंपली

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर केलेल्या आरोपामुळे देशमुख यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यामुळे त्यांची हकालपट्टी होणार हे अटळ होते. मात्र २० मे रोजी देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि दोनच दिवसाने दीड महिन्यापासून प्रलंबित असलेला हकालपट्टीचा आदेश काँग्रेसने जारी केला. वरवर ही काँग्रेसमधील अंतर्गत कारवाई वाटत असली तरी भाजपने फेकलेल्या जाळ्यात देशमुख अडकल्याचे स्पष्ट होते. यासाठी २०१४ व २०१९ च्या निवडणूक निकालांवर नजर टाकली तर ही बाब अधिक स्पष्ट होते.
२०१४ मध्ये देशमुख काटोलमधून भाजपचे आमदार होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले. काटोलमध्ये प्रथमच देशमुखांच्या मदतीने राष्ट्रवादीचा गड प्रथमच भेदला होता. देशमुखांनी भाजप सोडली तरी त्यांचे समर्थक या मतदारसंघात आहेत त्याचा फायदा भाजपला २०२४ च्या निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा… उदगीरमध्ये पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचा भाजपचा प्रयत्न

२०१९ मध्ये काँग्रेसमध्ये असताना देशमुख यांना पक्षाने थेट थेट देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री होते व सलग चारवेळा निवडून आले होते. त्या तुलनेत आशीष देशमुख यांची शहरातील ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे भाजपने फडणवीस यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प केला होता. तशी प्रचार यंत्रणाही राबवली होती. तरीही देशमुख यांनी कडवी झुंज दिली होती व त्यामुळे फडणवीस यांचे मताधिक्य वाढण्याऐवजी घटले होते. कुणबीबहुल असलेल्या या मतदारसंघात देशमुख यांनी चांगलीच मुसंडी मारली होती. ही बाब लक्षात घेता २०२४ च्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून पुन्हा फडणवीस यांच्या विरोधात उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती. भाजपमध्ये सध्या कुणबी समाजाचा मोठा नेता नाही, शिवाय समाजाच्या नेत्यांना केंद्र व राज्य सरकारने लक्ष्य केल्याने तो भाजपवर नाराज आहे, ही बाब फडणवीस यांच्यासाठी अडचणीची ठरू शकली असती. देशमुखांच्या हकालपट्टीमुळे काँग्रेसला या मतदारसंघात आता नवा चेहरा शोधावा लागणार आहे.

हेही वाचा… नांदेडमधील दोन ‘राज’कन्या कोण ?

असाच प्रकार सावनेर मतदारसंघाबाबतही आहे. हा मतदारसंघ काँग्रेस नेते सुनील केदार यांचा गड मानला जातो. २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपने सर्व प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. त्यामुळे यावेळी भाजपने सावनेरवर लक्ष केंद्रित केले आहे. येथे केदार यांच्या विरुद्ध भाजपकडे प्रबळ उमेदवार नाही. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत केंदार यांच्या विरोधात देशमुख हा पर्याय ठरू शकतो. वरील सर्व बाबींचा विचार केल्यावर व देशमुख काँग्रेसमध्ये नाराज असल्याचे लक्षात आल्यावरच भाजपने त्यांच्यावरचा जुना राग विसरून त्यांच्यावर जाळे फेकले. काँग्रेसमध्ये जमत नसल्याने देशमुखही भाजपच्या जवळ गेले. २९ तारखेला सावनेरमध्येच देशमुख यांनी मेळावा आयोजित केला आहे. त्यात अधिकृत पक्ष प्रवेशाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. एकूणच देशमुख यांचा राजकीय प्रवास पाहता भाजपने त्यांना पद्धतशीरपणे काँग्रेसविरोधात वापर करण्यासाठी खेळलेली खेळी यशस्वी झाल्याचे सध्यातरी दिसून येते.

Story img Loader