सर्वोच न्यायालयाच्या आदेशानंतर एसबीआयने (भारतीय स्टेट बँक) निवडणूक रोख्यांविषयीची सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. त्यानुसार, एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२४ दरम्यान भाजपानंतर देशात सर्वाधिक देणगी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मिळाल्याचे स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या देणगीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

हेही वाचा – Electoral Bond Data: EC कडून निवडणूक रोख्यांची इत्यंभूत माहिती जाहीर, भाजपाला मिळाली छप्परफाड देणगी

Maharashtra assembly elections
विश्लेषण: उमेदवारांच्या गर्दीमुळे छोट्या पक्षांची मते निर्णायक; समीकरणे कशी आहेत?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Shrivardhan Assembly constituency, NCP candidate, Aditi Tatkare
आदिती तटकरेंची मालमत्ता तीन कोटींनी वाढली, श्रीवर्धन मधून उमेदवारी अर्ज दाखल
jayant Patil, wealth, assembly election 2024
जयंत पाटील यांच्या संपत्तीत ३३ लाखांची वाढ
MP sandipan Bhumre, vilas bhumre, liquor shop permits
खासदार भुमरे कुटुंबाकडे मद्यविक्रीचे किती परवाने?
Chhagan Bhujbal, yeola assembly constituency,
छगन भुजबळ यांच्या मालमत्तेत साडेतीन कोटींनी वाढ
aaditya thackeray property details
आदित्य ठाकरेंची एकूण मालमत्ता २३ कोटी, तर दाखल गुन्ह्यांमध्ये ‘त्या’ नोंदीचा समावेश; प्रतिज्ञापत्रात सविस्तर तपशील!
article 324 to 329 of part 15 of constitution contains provisions regarding elections
संविधानभान : निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य धोक्यात?

निवडणूक आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसने एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२४ दरम्यान एकूण १६०९ कोटी रुपयांचे रोखे वठवले आहेत. तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान एकूण ४३.४ कोटी रुपयांचे रोखे वठवले.

खरं तर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या देणगीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये २७ मार्च ते २९ एप्रिल २०२१ दरम्यान विधानसभेच्या निवडणूक पार पडली. यादरम्यान एप्रिल महिन्यात तृणमूल काँग्रेसने ५५.४४ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वठवले. तसेच २ मे रोजी या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने एकूण १०७.५६ कोटी रुपयांचे रोखे वठवल्याचे पुढे आलं आहे.

हेही वाचा – Electoral Bonds: गेल्या ५ वर्षांत एकट्या भाजपानं निम्मे निवडणूक रोखे वटवले; आयोगानं ज…

याशिवाय तृणमूल काँग्रेसने ऑक्टोबर २०२१ मध्ये एकूण १४१.९२ कोटी रुपयांचे रोखे, तर जानेवारी २०२२ मध्ये २२४ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वठवले आहे. मात्र, त्यानंतर तृणमूल काँग्रेलला मिळालेल्या देणगीत घट झाल्याचं दिसून येत आहे. एप्रिल २०२२ मध्ये टीएमसीने एकूण १८ कोटी रुपयांचे रोखे वठवले, तर जुलै २०२२ मध्ये ६६.५ कोटी रुपयाचे रोखे वठवले. तसेच ऑक्टोबर २०२२ मध्ये तृणमूल काँग्रेसने एकूण १४३ कोटी रुपयाचे रोखे वठवल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.