भाजपचा गड सर करणारे अडबाले यांनी दीड वर्षापासूनच केली होती तयारी
बालेकिल्ल्यात भाजपला पराभूत करून नागपूर शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले सुधाकर अडबाले आहेत कोण याबाबत उत्सुकता आहे.सुधाकर अडबाले मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. मुळात कॉंग्रेस विचारसरणीचे असलेले अडबाले सुरूवातीपासून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाशी जुळले आहेत. यापूर्वी त्यानी ही निवडणूक लढवण्याची इछा संघटनेकडे व्यक्त केली होती. पण त्यांना संधी नाकारली. कालांतराने संघटनेत फुट पडली पण अडबाले मुळ संघटनेशी जुळून राहिले. यावेळी निवडणूक लढवायची ठरवून ते कामाला लागले. संघटनेतील दोन्ही गटात मिलाफ घडवून आणला.२२ मार्च २०२१ रोजी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची बैठक पार पडली. बैठकीला नागपूर शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार डी. यू. डायगव्हाणे, प्रांत अध्यक्ष श्रावण बरडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, शिक्षक मंडळाचे सदस्य जगदीश जुनगरी यांच्यासह पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि कार्यवाहक उपस्थित होते. तेथेच अडबाले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा