चुरूचे खासदार राहुल कासवान यांनी भारतीय जनता पक्षाला राम राम ठोकला आहे. सोमवारी ११ मार्च रोजी त्यांनी दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्ष सोडल्यानंतर राहुल कासवान यांनी भाजपावर अनेक गंभीर आरोप केले. भाजपा सरंजामशाहीचा पक्ष बनला आहे. देशातील गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या व्यथा ऐकून घेणारे भाजपामध्ये कोणी नाही, असंही कासवान म्हणालेत. देशातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत, मात्र भाजपा शेतकऱ्यांच्या आवाजाकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये राहून आपल्या भागातील जनतेच्या विकासासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले.

काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या काही तास आधी त्यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि लोकसभेचा राजीनामा जाहीर केला. त्यांना आता चुरूमधून काँग्रेसचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. हिसारचे खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी रविवारी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये सामील होण्याचं ठरवल्यानंतर कासवानांच्या या निर्णयामुळे विरोधी पक्षाला एक वेगळीच ताकद मिळाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अनेक नेत्यांच्या पक्षांतरामुळे विरोधी पक्ष त्रस्त झाला होता. राजस्थानमध्येच काँग्रेसने विद्यमान आमदार आणि काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) सदस्य महेंद्रजीत सिंग मालवीय, माजी केंद्रीय मंत्री लालचंद कटारिया आणि अशोक गेहलोत सरकारमधील माजी गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव यांच्यासह इतर अनेकांना नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली

हेही वाचाः प. बंगालमध्ये भाजपामधून नेत्यांचं ‘आऊटगोइंग’; नक्की काय घडतंय ममतादिदींच्या राज्यात?

कासवान यांनी दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतसरा आणि राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते टीका राम जुली यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर कासवान म्हणाले की, मी चुरूच्या लोकांच्या इच्छेनुसार काँग्रेसमध्ये सामील झालो आहे. शेतकऱ्यांचा आवाज बनून मी सत्ताधारी पक्षाच्या वाढत्या सरंजामी मानसिकतेवर हल्लाबोल करणार आहे. दोन वर्षांसाठी चुरू लोकसभा खासदार होण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. भाजपाचे चुरूचे दिग्गज नेते राजेंद्र राठोड यांनी सलग सात वेळा चुरू विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. १९८५ मध्ये चुरू येथे जनता पक्षाचे उमेदवार म्हणून लढताना राठोड यांचा काँग्रेसच्या हमीदा बेगम यांच्याकडून पराभव झाला होता. परंतु राठोड आणि कासवान यांच्या पक्षाअंतर्गत मतभेद होते. राठोड यांनी चुरू येथील रॅलीत जाहीर संताप व्यक्त केला होता, राठोड हे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात होते. राठोड हे राजपूत आणि कासवान हे जाट असल्याने त्यांच्या आरोपांनी चुरूलाही जातीपातीच्या आधारावर विभागले होते. तारानगरमधून निवडून आल्यानंतर सुमारे दोन डझन जाट अधिकाऱ्यांची कथित बदली केल्यामुळे पूर्वीचा मतदारसंघ असलेल्या चुरूमधून राठोड हे जाट समाजावर सूड उगवत असल्याचा आरोपही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर कासवान म्हणाले की, भाजपाचे राज्य नेतृत्व त्यांच्या आणि राठोड यांच्यातील मतभेद दूर करण्यात अयशस्वी ठरले आहे, माझे ऐकले गेले नाही आणि त्यांना वगळण्याचा निर्णय एकतर्फी घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. “राज्य नेतृत्वात संवादाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एका विशिष्ट व्यक्तीने संपूर्ण व्यवस्थेशी तडजोड केली आहे आणि आता त्याचा परिणाम तुमच्यासमोर आहे,” असेही कासवान म्हणाले.

हेही वाचाः काँग्रेसने उचलला भाजपाचा ‘हा’ मोहरा; जाट मतपेटीचे समीकरण बदलणार?

तिसऱ्या पिढीतील राजकारणी

खरं तर ४७ वर्षीय कासवान हे चुरू येथील तिसऱ्या पिढीतील राजकारणी असल्याचे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यांचे कुटुंब गेल्या चार ते पाच दशकांपासून सार्वजनिक जीवनात काम करीत आहे. १९२५ मध्ये त्यांचे आजोबा दीपचंद यांचा जन्म चुरूच्या राजगडमधील कालरी गावात झाला आणि ते १९८० मध्ये सादुलपूर (चुरू) येथून अपक्ष म्हणून निवडून आले. कासवानचे आई-वडील दोघेही सामाजिक कार्यात पुढे असायचे. त्यांचे वडील रामसिंग कासवान आणि आई कमला कासवान हे १९९८ आणि २००८ मध्ये सादुलपूरमधून भाजपाचे आमदार म्हणून निवडून आले होते. सादुलपूर हे कासवानचे जन्मस्थानही आहे. राम सिंह हे चुरूचे चार वेळा खासदार राहिले आहेत, ते १९९१, १९९९, २००४ आणि २००९ मध्ये निवडून आले आहेत. २०१९ मध्ये राहुल कासवान यांची मतदानाची टक्केवारी ५९.५९ टक्क्यांपर्यंत वाढली आणि ३४.६४ टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसच्या रफिक मंडेलियाच्या विरुद्ध त्यांनी थोडे थोडके नव्हे तर तब्बल ३.३४ लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला.

Story img Loader