केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. बिहारमध्येसुद्धा हेच चित्र पहायला मिळत आहे. सध्या बिहारमध्ये विरोधाचे श्रेय घेण्यावरून लढाई सुरू आहे. अग्निपथला विरोध करण्याचे श्रेय नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला मिळू शकेल असे वाटल्यामुळे आता आरजेडी पुढे सरसावली आहे. केंद्र सरकारने अग्निपथ योजना सुरू करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केली आहे. तेजस्वी यादव यांनी अग्निपथ योजनेचा निषेध केला आहे. आंदोलन करण्याऱ्या तरुणांच्या भावनांशी ते सहमत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.आरजेडीसाठी तरुण मतदार अत्यंत महत्वाचे आहेत. त्यांना आकर्षित करण्याचा आणि पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न तेजस्वी यादव नेहमीच करत असतात. नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी १० लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा