राष्ट्रवादीतील बंडानंतर मूळ पक्षात विविध खबरदारी घेतली जात आहे. याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासाठी “एकनिष्ठतेची मोहिम” हा कार्यक्रम राबवण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्राच्या हिताचा लढा पुरोगामी विचारांनी लढण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्याची आपली भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमाद्वारे मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पातळीवरील ‘केडर’ या दुभंगलेल्या परिस्थितीत अजित पवार गटाकडे आकर्षले जावू नये याची खबरदारी घेतली. यासाठी “एकनिष्ठतेची मोहिम” हा कार्यक्रम राबवण्यास सुरूवात केली आहे. या कार्यक्रमात पुरोगामी विचारांनी लढण्यासाठी शरद पवार यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे जाहीर केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे आपल्या समर्थक आमदारांसह भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाले. अजित पवारांसह आठ अशा ९ जणांना मंत्रिपदे मिळाली. अजित पवार यांच्या भुमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष स्तरावर गटबाजी दिसू लागली. अजित पवारांना मानणारा कार्यकर्ता तसेच पदाधिकारी अजित पवारांच्या कळपात सामील व्हायला सुरूवात झाली. अजित पवार गटाने लगेच त्यांच्या गटात सामिल होणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आपल्या गटात समाविष्ट करून घेताना नेमणूका करण्याचे सत्र अवलंबले. त्यांना नेमणूक पत्रे देण्याचा सपाटा लावला.
हेही वाचा : जतमध्ये माजी आमदाराचेच भाजप नेतृत्वाला आव्हान
अजित पवार गटाचा हा पावित्रा पाहून मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भूमिकेचा वारंवार उल्लेख करीत कार्यकर्ते, पदाधिकारी यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनी अजित पवार यांच्या फुटीनंतर पहिली सभा येवल्यात तर दुसरी सभा बीडमध्ये घेऊन तरूण कार्यकर्ता कसा आपल्यासोबत एकसंध राहिल याची दक्षता घेतली आहे.
हेही वाचा : यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड या महिला नेत्यांकडे काँग्रेसमध्ये महत्त्वाची जबाबदारी
त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटरवरून हा मेसेज प्रसारीत केला आहे. “आदरणीय पवार साहेबांच्या साथीने महाराष्ट्राच्या हिताचा लढा पुरोगामी विचारांनी लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष माननिय आमदार जयंत पाटील यांच्या पुढाकारातून ‘एकनिष्ठतेची मोहीम’ राबवण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 7030120012 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि तुमचे अधिकृत डिजीटल कार्ड डाऊनलोड करून घ्या!” या संदेशाचा उपयोग झाला असून, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी वर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्वरित मिस्ड काॅल देऊन आपले डिजीटल कार्ड डाऊनलोड करण्यास सुरूवात केली आहे.