पुणे : भाजपसमर्थक मतदारबहुल विधानसभा क्षेत्र असूनही महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना खडकवासला येथून अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नव्हते. तेव्हाच मतदारांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी भाजपची मैत्री नाकारल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, त्यानंतरही आता विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजपला आपला पारंपरिक खडकवासला विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटासाठी सोडावाल लागण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असलेल्या वडगाव शेरी मतदारसंघावर भाजपने दावा केला असताना, ‘वडगाव शेरी’ मिळाल्यास तडजोड म्हणून ‘खडकवासला’ची मागणी ‘राष्ट्रवादी’कडून होण्याची शक्यता असल्याने खडकवासला महायुतीमध्ये कळीचा मतदारसंघ झाला आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यामान आमदार भीमराव तापकीर आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी ‘हॅटट्रिक’ साधली होती. आता चौथ्यांना ते निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार असताना, बदललेल्या राजकीय समीकरणामुळे त्यांच्यापुढे नवीन मित्रामुळे आव्हान उभे राहिले आहे.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Kothrud Assembly Constituency Assembly Election 2024 Division of Hindutva votes between BJP Shiv Sena Thackeray and MNS Pune news
‘सुरक्षित’ असूनही भाजपची कसोटी
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?

हेही वाचा >>> ओबीसी आरक्षणातील मुस्लिम कोट्यावरून कर्नाटक सरकार व राष्ट्रीय मगासवर्ग आयोगात संघर्ष

या मतदारसंघाची २००९ मध्ये निर्मिती झाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत ‘सोनेरी आमदार’ अशी ख्याती झालेले दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी मनसेकडून निवडणूक लढवून विजय साकारला होता. मात्र, २०११ मध्ये त्यांचे अकाली निधन झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. तेव्हा भाजपने अगदी नवखे असलेले माजी नगरसेवक भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे या होत्या. तापकीर यांनी अवघ्या ३,६२५ मतांनी वांजळे यांचा पराभव केल्याने हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला. या मतदारसंघात भाजपबहुल मतदारांची संख्या जास्त आहे. त्याचा फायदा तापकीर यांना मागील तीन निवडणुकांमध्ये होत आला आहे. २०११ नंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये ते विजयी झाले. आता चौथ्यांदा हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी तयारी केली आहे.

हेही वाचा >>> Savitri Jindal : भारतातील सर्वांत श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचं भाजपाच्या विरोधात बंड; अपक्ष निवडणूक लढवणार!

वडगाव शेरीशी अदलाबदल?

वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे आहेत. मागील निवडणुकीत टिंगरे यांनी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता. तो पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसशी राज्यात मैत्री झाली असली, तरी टिंगरे आणि मुळीक यांच्यात मतभेद आहेत. कल्याणीनगर अपघात प्रकरणात टिंगरे यांचे नाव आल्यानंतर मुळीक यांनी ही संधी सोडली नाही. आता मुळीक यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. मुळीक यांचा हट्ट पुरविला गेल्यास त्याबदल्यात भाजपला खडकवासला मतदारसंघ अजित पवार गटासाठी सोडावा लागेल, अशी चर्चा आहे.

महायुतीत उमेदवारीचे त्रांगडे

महायुतीकडून विद्यामान आमदार भीमराव तापकीर हे प्रबळ दावेदार आहेत. अजित पवार यांच्या रार्ष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांचे नाव चर्चेत आहे. २०१४ च्या निवडणुकीत तापकीर आणि बराटे यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी तापकीर यांनी बराटे यांचा ६३ हजार २६ मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुर वांजळे यांची जवळीक आहे. त्यांचे फलक मतदारसंघात झळकत आहेत. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश कोंडे यांनी तयारी सुरू केली आहे.