जम्मू-काश्मीर हे २०१९ मध्ये केंद्रशासित प्रदेश जाहीर झाल्यानंतर अजुनही तिथेविधानसभा निवडणुका झालेल्या नाहीत. दोन दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर होते. येत्या डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती त्यांनी दिली. असं असलं तरी जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्षांनी याआधीच निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यावेळी जम्मू-काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांनी जम्मूतील चिनाब आणि पीर पंजाल (Chenab Valley and Pir Panjal) भागात लक्ष केंद्रीय करायला सुरुवात केली आहे. जम्मू हा हिंदू बहुल भाग म्हणून ओळखला जातो तर काश्मीर हा मुल्सिम बहुल भाग म्हणून ओळखला जातो. तर चिनाब आणि पीर पंजाल या भागात दोन्ही धर्मांचे मतदार सारख्याच संख्येने आहेत. त्यामुळेच या दोन्ही भागांकडे आता राजकीय पक्षांनी मोर्चा वळवला आहे. जम्मू मध्ये ४३ विधीानसभेच्या जागा आहेत. यापैकी चिनाब आणि पीर पंजालमध्ये एकुण १६ जागा असल्याने या भागाला महत्व प्राप्त झाले आहे.
नॅशनल कॉन्फरन्स ( National Conference-NC) आणि पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (Peoples Democratic Party-PDP) या दोन्ही पक्षांचे पारंपिराक मतदार हे काश्मीर खोऱ्यात आहेत. आता या दोन्ही पक्षांनी चिनाब आणि पीर पंजालकडे लक्ष केंद्रीत करायला सुरुवात केली आहे. पीडीपीच्या प्रमुख नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी गेल्या सहा महिन्यात दोनदा पीर पंजालचे प्रदीर्घ दौरे केले आहेत. तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेतेही सातत्याने त्या भागात भेटी देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘अपनी पार्टी’ चे नेते अल्ताफ बुखारी आणि भाजपाही या भागात नियमित दौरे सुरु आहेत.
पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशन (पीएजीडीने) ( Peoples Alliance for Gupkar Declaration-PAGD) यांच्यासाठीही हा भाग महत्त्वाचा आहे. पीएजीडीमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी हे दोन महत्त्वाचे पक्ष आहेत. या दोन्ही पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये हातमिळवणी करणार असल्याचे संकेत दिले आहेत. अर्थात याबाबात अधिकृत घोषणा जरी करण्यात आली नसली तरी काही प्रमुख मुद्दांवर एकमत होत ही आघाडी होईल अशी चिन्हे आहेत.
“विकासाचा मुद्दा हा या निवडणुकीतला प्रमुख मुद्दा नाहीये, वीज-पाणी या मुद्दांपेक्षा आम्ही एकत्रित आहोत हा संदेश या निवडणुकीच्या माध्यमातून देणार आहोत. ही अस्तित्वासाठी लढाई असणार आहे. ओळख पुसू नये साठी ही निवडणुक असणार आहे. भावनांच्या मुद्द्यांवर ही निवडणुक लढवली जाणार आहे” अशी प्रतिक्रिया पीएजीडीने दिली आहे.
पीएजीडी आणि काँग्रेसची आघाडी या निवडणुकीत होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. इंडियन एक्सप्रेसला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेससोबत निवडणुक ही फक्त तांत्रिक मुद्द्यांवर लढवली जाऊ शकते. “खरं सांगायचं तर काँग्रेस पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये पुर्णपणे खिळखिळा झाला आहे. चर्चेती बोलणी राज्यातील कोणत्या नेत्याशी करायची हा प्रश्न आहे” अशी प्रतिक्रिया पीएजीडीतल्या संबधित सुत्रांनी दिली आहे.
‘पीडीपी’च्या वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार काँग्रेस पीएजीडीसोबत युती करायला तयार नाही. कारण जम्मूमध्ये भाजपा आणि काँग्रेसची व्होट बॅक ही सारखीच आहे. पण त्यापेक्षा जर पीएजीडीसोबत युती केली तर जम्मूमध्ये प्रतिमाला धक्का बसू शकतो अशी भिती काँग्रेसला आहे. डिसेंबर २०२० ला झालेल्या जिल्हा विकास परिषदच्या निवडणुकीत काँग्रेसने गुपकर आघाडीपासून अंतर ठेवणे पसंत केले होते. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत तांत्रिक मुद्द्यांवरच काँग्रेस आणि गुपकर आघाडी यांच्यात हातमिळवणी होऊ शकते अशी शक्यता आहे.
या सर्व राजकीय घडामोंडीमध्ये काँग्रसचे दिग्गज नेते गुलाम नबी आजाद हे काय करणार यांकडे सर्वांचे लक्ष आहे. ते काँग्रेसबरोबर जाणार की स्वतःचा पक्ष स्थापन करणार हे अजुन स्पष्ट नाही. पण त्यांनी जर स्वतंत्र पक्ष स्थापन केला तर त्याचा फटका गुपकर आघाडीला बसू शकतो, कारण मु्स्लिम व्होट बॅक विभाजीत होत त्याचा फायदा भाजपाला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.