सुहास सरदेशमुख लोकसत्ता

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे राजकीय दुकान चालावे म्हणून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा हाती घेतला. ३०- ३५ वर्षापासून त्यावर घाणरडे राजकारण सुरू आहे. खरे प्रकरण न्यायालयात असताना केंद्र सरकारने घेतलेला निर्णय आम्ही सर्वोच्च न्यायालयापेक्षाही मोठे आहोत असे सांगणारा आहे त्यामुळे निर्णयामागे हुकुमशाही वृत्ती दिसते अशी टीका करत एमआयएमचे खासदार इत्मियाज जलील यांनी आम्ही आमची नाराजी रस्त्यावरही व्यक्त करू, त्यासाठी कोणत्या प्रकारचे आंदोलन करायचे यावर शहरातील विविध व्यक्तीशी चर्चा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना

हेही वाचा >>> विमानतळाच्या मागणीतही भाजपामधील गटबाजीचे प्रदर्शन

. जी- २० समूह देशातील प्रतिनिधी औरंगाबादमध्ये येत असल्याने कोणतेही आंदोलन करू नये अशी विनंती करणारे दूरध्वनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले होते. जगभरात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून आम्ही शांत राहिलो पण या निर्णयाच्या अनुषंगाने असणारी नाराजी व्यक्त केली जाईल. हा लढा आम्ही लढूच असे जलील यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यामागे महापुरुषांचा आपण सन्मान करतो आहोत असे जर कोणाला वाटत असेल तर तसे नसते. महापुरुष हे मोठेच असतात. आम्हालाही संभाजीमहाराजांचा आदरच आहे. पण केवळ घाणेरड्या राजकारणासाठी हे सारे घडवून आणले गेले. खरे तर नामांतर प्रक्रियेवर आक्षेप घेण्यासाठी २७ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण तत्पूर्वीच हा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारे निर्णय घेतल्यानंतर त्याला हिंदू- मुस्लिम व्देषाची किनार लावली जात आहे.

हेही वाचा >>> रायगडमध्ये भाजपची लोकसभेची तयारी, शेकापला आणखी गळती

जर महापुरुषांचीच नावे द्यायची असतील तर महात्मा ज्योतिबा फुले यांची जन्मभूमी असणाऱ्या पुण्याचे नाव फुलेनगर करावे, कोल्हापूरचे नाव शाहूनगर करावे, नागपूरचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरी करावे आणि मुंबईचे नाव छत्रपती शिवाजीराजे नगर करावे. तसे प्रस्ताव राज्यकर्त्यांनी आणले तर त्याला एमआयएमचा विरोध असणार नाही. पण केवळ राजकारणासाठी हे सारे सुरू असल्याने या निर्णयास विरोध केला जाईल. न्यायालयीन लढा आणि रस्त्यावर उतरुन हा लढा दिला जाईल असे जलील म्हणाले. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा विरोध पक्ष म्हणून तर असेलच पण त्याशिवाय तो ‘ औरंगाबादकर’ म्हणून नोंदविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दोन बैठका झाल्या असून आखणी काही बैठका घेतल्यानंतर आंदोलन हाती घेऊ असे जलील यांनी सांगितले.

Story img Loader