छत्रपती संभाजीनगर : महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने उस्मानाबादची जागा प्रतिष्ठेची केली. जागा वाट्याला आली तरी तगडा उमेदवार जवळ नसल्यावने भाजपच्या सल्ल्याने आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणून त्यांना उमेदवारी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मतदारसंघात सभा घेतली पण या सभेला अजित पवार दिसलेच नाहीत. ते बारामतीमध्येच अडकल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. धाराशिवच्या सभेत विरोधक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा असताना मोदी यांनी टीकेचा सर्व सूर काँग्रेसविरोधाचा लावला होता.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एकेकाळी राष्ट्रवादीचा वरचष्मा होता. डॉ. पद्मसिंह पाटील त्यांचे चिरंजीव राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडे शरद पवार यांनी जिल्ह्याच्या विकासाची धुरा दिली होती. मजबूत राजकीय पकड असणाऱ्या राष्ट्रवादी कॉग्रेसला घरघर लागली २०१४ पूर्वीच्या निवडणुकीमध्ये. सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत राणा जगजीतसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह उंचावणारे कार्यकर्तेच शिल्लक राहिले नाहीत. उमरगा तालुक्यातील सुरेश बिराजदार यांच्याबरोबर काही माेजकेच कार्यकर्ते शिल्लक होते. अजित पवार यांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा संचही शिल्लक नव्हता. तरीही उस्मानाबादच्या जागेवरचा हक्क त्यांनी हट्टाने कायम ठेवला. राज्यात बारामती, उस्मानाबाद, शिरूर आणि रायगड हे मतदारसंघ अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय महायुतीने घेतला. त्यामुळे पंतप्रधानांच्या सभेच्या वेळी ते या मतदारसंघात तरी उपस्थित राहतील, असे राजकीय संकेत होते. मात्र, उस्मानाबादच्या सभेत अजित पवार यांच्याऐवजी प्रफ्फुल पटेल यांनी प्रास्ताविक केले. गेल्या काही दिवसापासून अजित पवार हे बारामतीमध्येच तळ ठोकून असल्याचे सांगण्यात येत आहे.

Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Ajit Pawar
Ajit Pawar : “…तर माझ्या बरोबर कुणीही काम केलं नसतं”, अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं
Punjab BJP President Sunil Jakhar resignation ie
पंजाब भाजपात सावळागोंधळ! प्रदेशाध्यक्ष म्हणतात, “मी सहा महिन्यांपूर्वी राजीनामा दिला”, पदाधिकाऱ्यांच्या मते पक्षाची धुरा त्यांच्याकडेच, नेमकं चाललंय काय?
Ajit Pawar Amit Shah Sunil Tatkare
अमित शाहांनी अजित पवारांची भेट नाकारली? दिल्लीत नेमकं काय घडतंय? तटकरेंनी सगळा घटनाक्रम सांगितला
Apoorva hiray, Ajit Pawar meet Apoorva hiray,
अजित पवार गटात अपूर्व हिरे यांचा प्रवेश ?

हेही वाचा : रिक्षाचालक ते टेलर, ‘हे’ आहेत वायएसआर काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाराशिव शहरातील सभेत कॉग्रेसवर जोरदार टीका केली. या जिल्ह्यात मधुकरराव चव्हाण हे तसे आता काॅग्रेसचे एकमेव नेते. नुकताच त्यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश घेतला. या जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणारे बसवराज पाटील हेही भाजपमध्ये गेले. त्यामुळे कॉग्रेस पक्ष चालविणारे तरुणांचा एक चमू शिल्लक आहे. पण त्यांची ताकद लोकसभा मतदारसंघात प्रभाव निर्माण करण्याची नाही. त्यामुळे तुलनेने कमजोर कॉग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलली टीका उस्मानाबादकरांनामध्ये चर्चेचा विषय ठरू लागली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील लढत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नकली शिवसेना ’ असा केवळ एक वेळा केलेला उल्लेख पथ्यावर पडेल असा दावा उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते करू लागले आहेत. पंतप्रधानांच्या सभेनंतर चर्चा सुरू आहे ती अजित पवार कुठे होते याची. या अनुषंगाने राष्ट्रवादी काॅग्रेसमधील नेत्याला विचारले असता ते म्हणाले, ‘ त्यांची स्वतंत्र सभा होणार आहेच. ते उमेदवारी अर्ज भरताना पूर्ण वेळ हजर होते. वेळचे व्यवस्थापन म्हणून ते नव्हते.’

Story img Loader