दिगंबर शिंदे
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर स्थिरस्थावर होताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगलीत लक्ष घालून गटबांधणी सुरू केली आहे. पक्ष बांधणी करीत असताना एकीकडे अख्खा पक्ष थोरल्या पवार साहेबासोबत पर्यायाने आपल्या पाठीशी असल्याचे सांगणार्‍या प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना शह देत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटालाही शह देण्याचा प्रयत्न दिसतो आहे. विट्याचे वैभव पाटील यांना सोबत घेउन आमदार अनिल बाबर यांच्या पारंपारिक विरोधकांना ताकद देण्याचा चाललेला प्रयत्न हा त्याचाच एक भाग म्हणता येईल.

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असल्याने आणि राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे दर्शविण्यात प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील प्रारंभीच्या काळात यशस्वी ठरले असले तरी आता गळती सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, पक्षाचे सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे द्विधा मनस्थितीत असलेल्या आमदार जयंत पाटलांना एक प्रकारचा इशाराच मानला जात असून ही गळती यापुढेही सुरूच राहण्याची चिन्हे आहेत.

Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Ajit Pawar on dowry
Ajit Pawar : सामूहिक लग्न सोहळ्यामुळे हुंड्यासारख्या प्रथा बंद होतात – उपमुख्यमंत्री अजित पवार
Sandeep Deshmukh Wardha district Ajit Pawar NCP group
वर्धा जिल्ह्यात सहकार गटात उभी फूट, एकाच घरी दोन झेंडे
MLA Rohit Pawar On NCP Sharad Pawar
Rohit Pawar : शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या पक्षात फेरबदल…”

आणखी वाचा-पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या निधी वाटपावरून वाद

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील आमदार सुमनताई पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अरूण लाड आदींनी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला होता. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पक्ष एकसंघपणे थोरल्या पवारासोबत ठेवण्याचा प्रयत्न चालविला होता. मात्र, वेळ जाईल तसे पक्षातील दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते, विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यामध्ये असलेली अस्वस्थेला नवीन घुमारे फुटू लागले आहेत. सांगलीचे माजी महापौर तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तातडीने उपमुख्यमंत्री अजितदादांचे अभिनंदन करण्यासाठी मुंबईला धावत गेले होते. त्यांच्या भेटीचे छायाचित्र समाज माध्यमातून प्रसारित होताच, त्यांनी मी थोरल्या पवारसाहेबांसोबतच आहे असा खुलासाही केला होता. तथापि, महापौर पदाची मुदत संपताच त्यांनी दादांशी संपर्क करून मुंबईतील बैठकीला हजेरीही लावली. त्यांच्यासोबत विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रा. जगदाळेही होते. आमदार पाटील यांच्या कार्यपध्दतीवर नाराज असलेली मंडळी दादासोबत जाण्यास इच्छुक आहेत.

राष्ट्रवादीतील दादा गटाची पक्ष बांधणी सध्या सुरू आहे. सांगलीमध्ये आपला गट विस्तारण्याची आणि गटाची नव्याने बांधणी करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. पुणे, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची जबाबदारी दादांच्यावर आहे. यामुळे आपला गट बांधणीसाठी जिल्ह्यातील मोजक्या पण, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास नाराज असलेल्या मंडळींची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतच पक्षाची मोचेबांधणी करीत असताना अन्य पक्षातील नाराज असलेल्या आणि जनाधार असलेल्यांना संधी देण्याचे धोरण निश्‍चित करण्यात आले आहे.

आणखी वाचा- अकोल्यात पक्षांतराचे वारे, शिवसेना ठाकरे व शिंदे गटाकडे ओढा

अजितदादा गटाची पक्ष बांधणी आणि मोर्चेबांधणी ही लोकसभेसाठी निश्‍चितच नाही. त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे ती विधानसभा निवडणुकीसाठीच आहे. ज्या मतदार संघामध्ये गत निवडणुकीत दोन नंबरची मते घेतली आहेत अशांना घेऊन आमदार पाटील यांच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न दादा गटाचा दिसत आहे. विट्यात माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना सोबत घेण्यात आले आहे. खानापूर-आटपाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटचे सहकारी आमदार अनिल बाबर यांनाही शह देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने दिसत आहे. विट्यातील माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा गट अगोदर काँग्र्रेसमध्ये होता. कदम गटाकडून राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न होउ लागताच या गटाने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मात्र स्थानिक राजकारणातून आमदार पाटील यांच्याकडून अपेक्षित ताकद मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर हा गट आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास फारसा उत्सुक राहिला नव्हता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पर्याय उपलब्ध झाला आहे. विट्यातील पाटील गटाची राष्ट्रवादीमध्ये होत असलेली घुसमट लक्षात घेउन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना आपल्या गटात दादांनी घेतले असले तरी यामुळे जयंत पाटील यांना झळ बसण्याऐवजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटालाच अधिक झळ बसणार आहे.

दादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पातळीवरील पदाधिकार्‍यांची नियुक्ती येत्या आठवड्याभरात होणार आहे. त्यानंतर पक्ष बांधणीला जोर येणार आहे. यासाठी अजितदादा जिल्ह्यात प्रथमच विट्याला येतील असे दिसते. या माध्यमातून आपला गट विस्तार करण्यासाठी नाराजांची फौज एकसंघ करीत असताना राजकीय हिशोब मांडण्याबरोबच महायुतीतही आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न दिसत आहे.

Story img Loader