सुजित तांबडे
पुणे : आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. शहराच्या जम्बो कार्यकारिणीबरोबरच पहिल्या टप्प्यात एकाच वेळी ३०० पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ‘राष्ट्रवादी’चे शहरातील प्रमुख नेते अजित पवार गटात सामील झाल्याने मूळ राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मूळ राष्ट्रवादी एकाकी पडली असताना, अजित पवार गट राष्ट्रवादी भवनावर कब्जा करण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, कब्जा करणे अजित पवार गटाला अशक्य झाल्याने त्यांनी नारायण पेठेतील एका मंगल कार्यालयातून पक्ष कामाला आरंभ केला आहे. परिणामी राष्ट्रवादी भवन आता ओस पडले आहे.

हेही वाचा >>> उपराजधानी नागपूर राजकीय घडामोडींचे महत्त्वाचे केंद्र

Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Jayant Patil regret reaction on very small size of opposition
जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे विरोधकांचा आकार एकदम छोटा, जयंत पाटलांकडून खंत
Tejswini Pandit
“लवकर बरं व्हायचं आहे”, तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? पोस्टवर स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधवने केल्या कमेंट्स
Gulabrao Deokar , BJP, Ajit Pawar group, Ajit Pawar ,
गुलाबराव देवकर यांची पाऊले आता भाजपकडे, अजित पवार गटात पक्षप्रवेशास विरोध
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ज्यांना जिथे जायचं ते तिथे जाऊ शकतात”, अजित पवार गटाच्या नेत्याचं भुजबळांच्या नाराजीबाबत मोठं विधान
Sharad pawar Wrote a Message to Chhagan Bhujbal
Sharad Pawar : शरद पवारांनी लिहून दिलेला संदेश जेव्हा छगन भुजबळ वाचतात, पुण्यातल्या कार्यक्रमातल्या ‘त्या’ कृतीची राजकीय वर्तुळात चर्चा
Narhari Zirwal On Sharad Pawar
Narhari Zirwal : “शरद पवारांकडे जाणार आणि लोटांगण घालून…”, अजित पवार गटाच्या मंत्र्याचं मोठं विधान

अजित पवार गटाने पक्षाची पायामुळे मजबूत करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे. पक्ष बांधणीसाठी मूळ राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोडण्याचे आव्हान अजित पवार गटापुढे होते. त्यामध्ये त्यांना यश आले आहे. पुण्यातील बहुतांश सर्व प्रमुख नेते अजित पवार गटात सामील झाले आहेत. शहराची जम्बो कार्यकारणी अजित पवार गटाने तयार केली आहे. त्यामध्ये शहराध्यक्षपदी दीपक मानकर आणि कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची नेमणूक यापूर्वीच झाली आहे. त्यानंतर युवक, विद्यार्थी, विधानसभा मतदारसंघनिहाय अध्यक्ष यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. या प्रत्येक विभागाच्या पदाधिकाऱ्यांनाही नियुक्तीपत्र देऊन कामाला सुरुवात करण्याची सूचना अजित पवार यांनी केली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते एकाचवेळी ३०० पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन पक्ष बांधणीचा श्री गणेशा करण्यात आला आहे. या नेमणुकांमुळे सध्या शरद पवार गटामध्ये अस्वस्थता पसरली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबईत ठाकरे गटाचे पुन्हा आगरी कार्ड

याबाबत कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख म्हणाले, ‘पक्ष बांधणीच्यादृष्टीने कामाला सुरुवात करण्यात आली आहे. विविध पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे आगामी काळात विविध उपक्रम राबवून पक्ष आणखी मजबूत करण्याचे काम केले जाणार आहे. एकाचवेळी ३०० पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली असल्याने सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत’

राष्ट्रवादी भवनावरील दावा सोडला

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्यालय शिवाजीनगर येथे आहे. राष्ट्रवादी भावनावर अजित पवार गट कब्जा करणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, या जागेचा करार माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष (शरद पवार गट) प्रशांत जगताप यांच्या नावे असल्याने अडचण निर्माण झाली. त्यामुळे अजित पवार गटाने राष्ट्रवादी भवनावरील दावा सोडला आहे. सध्या नारायण पेठ येथील एका मंगल कार्यालयातून कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. बहुतांश नेते आणि पदाधिकारी अजित पवार यांच्या गटात सामील झाल्याने शहरातील राष्ट्रवादी भवन ओस पडले आहे.

अजित पवार यांचे छायाचित्र हटविले राष्ट्रवादी भवनातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छायाचित्र मूळ राष्ट्रवादी काँग्रेसकडून हटविण्यात आले आहे. अजित पवार यांच्या हस्तेच या कार्यालयाचे काही महिन्यांपूर्वी उद्घाटन झाले होते.

Story img Loader