अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक – कधीकाळी देशात नावाजलेली, पण मागील काही वर्षात वाढती थकबाकी, तोट्यामुळे अडचणीत आलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पुनरुज्जीवन करताना लाखो शेतकरी मतदारांना आपलेसे करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जिल्हा बँकेचा परवाना रद्द होऊ नये म्हणून आम्ही शर्थीने प्रयत्न करत आहोत. त्यात यशस्वी झालो तर चुकीचे काम करणाऱ्यांना पुन्हा बँकेत पाठवू नका. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हात जोडून ही विनंती करण्यामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणाऱ्या ग्रामीण भागात आपले बस्तान बसविण्याचा भाग म्हणून पाहिले जात आहे.

Multi-candidate contests on most seats in Nashik 196 candidates in 15 constituencies
नाशिकमध्ये बहुसंख्य जागांवर बहुरंगी लढती; १५ मतदारसंघात १९६ उमेदवार
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Baroda BNP Paribas Mutual Fund, Prashant Pimple,
‘व्याजदर शिखरावर असताना दीर्घ मुदतीची रोखे गुंतवणूक योग्य’
Anil Deshmukh criticizes Ajit Pawar, Anil Deshmukh latest news, Ajit Pawar latest news,
अनिल देशमुखांची अजित पवारांवर टीका, म्हणाले, “ते फडणवीसांच्या मांडीवर बसल्याने आबांवर…”
in navi mumbai cidco Contractor officials faced villagers anger after arriving to start work in Devad on Wednesday
नैना प्रकल्पाचे काम करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना पिटाळले
shrimant dagdusheth ganpati temple, Phuket, Thailand
थायलंडमध्ये प्रति ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर, फुकेतमध्ये ‘लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालय’ लवकरच खुले
name similarity Nashik , Maharashtra assembly election, election nashik, nashik latest news, nashik election marathi news,
नाशिकमध्ये पुन्हा नामसाधर्म्याचे डावपेच
mpsc 1333 post exam
नोकरीची संधी: लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेद्वारे भरती

हेही वाचा >>> बच्‍चू कडू, रवी राणांमध्‍ये वाद; अमरावतीत सत्‍तारूढ आघाडीतील मित्र पक्षांमध्येच सुंदोपसुंदी!

ग्रामीण भागात सत्तेचा मार्ग सहकारातून जातो, हे समीकरण राज्यात चांगलेच रुळले आहे. राष्ट्रवादीतील दुफळी, नव्या सत्ता समीकरणांचा नेमका काय परिणाम होईल, याची स्पष्टता आगामी निवडणुकांमधून होईल. तत्पुर्वी सर्वपक्षीयांनी आपले गड मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी अजित पवार गटाचा पुढाकार तेच अधोरेखीत करते. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्व सहा आमदार अजित पवार यांच्याबरोबर आहेत. पक्ष संघटनेत वेगळी स्थिती नाही. दुसरीकडे फाटाफुटीने नाउमेद न होता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघात नव्याने तयारीला वेग दिला आहे. अजित पवार गटातील सर्व आमदारांचा मतदार हा प्रामुख्याने शेतकरी आहे. या भागात शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग असल्याचे पक्षांतर करणारे राष्ट्रवादीचे आमदार नाकारू शकत नाहीत. लाखो शेतकरी मतदारांना बरोबर ठेवण्यासाठी अजित पवार गट  सत्तेत सहभागी झाल्यापासून जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी आग्रही भूमिकेत राहिला.

मध्यंतरी या बँकेचा परवाना रद्द करण्याचा बडगा उगारला गेल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह स्थानिक आमदारांनी तिचे पुनरुज्जीवन व्हावे, म्हणून जोर लावला. त्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पाठबळ मिळाले. बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी आराखडा तयार होऊन सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत झाली. राज्य सरकार आणि राज्य बँकेच्या पाठबळावर अजित पवार यांनी नाशिक जिल्हा बँकेवरील आर्थिक संकट दूर करण्याची योजना आखली आहे. बँकेसमोरील अडचणी, समस्या आम्ही निस्तरणार आणि पुन्हा तिचा कारभार चुकीच्या व्यक्तींच्या हाती दिल्यास येरे माझ्या मागल्या.. अशी गत होऊन बँक अडचणीत येईल, याची जाणीव त्यांनी नाशिक दौऱ्यात करून दिली. कोणते बटण दाबायचे हे तुमच्या हाती आहे, असे त्यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात शेतकरी सभासदांना उद्देशून नमूद केले.

हेही वाचा >>> सोलापूरमध्ये सत्ताकेंद्र कायम ठेवून भाजपचे दोन आमदारांना पाठबळ

एक ते दीड दशकात बँकेवर ज्यांची सत्ता होती, त्यांच्या अनागोंदी कारभाराने बँकेची घडी पूर्णत: विस्कटली, चौकशीतून ते यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. या काळात राष्ट्रवादीशी संबंधित काही आमदार संचालक म्हणून बँकेत होते. मात्र, अध्यक्षपद त्यांच्याकडे नव्हते. तीन वर्षांपासून बँकेवर प्रशासक आहे. जिल्हा बँकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची राष्ट्रवादीला आजवर गरज वाटली नव्हती. नाशिकचे पालकमंत्रीपद सांभाळताना खुद्द छगन भुजबळही बँकेच्या राजकारणापासून तसे अलिप्त राहिले होते. अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर मात्र जिल्हा बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी या गटाने कंबर कसली आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जी सर्वपक्षीय मंडळी कार्यरत होती, त्यांनी बँकेची वाताहत केली. पुन्हा असे घडू नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील काळात चुकीच्या मंडळींच्या हाती बँकेचा कारभार न देता सहकारातील योग्य व्यक्तींची निवड करा, अशा अर्थाने सूचना केली आहे. आपण पुढील पाच वर्ष जिल्हा बँक प्रशासकांच्याच ताब्यात ठेवावी, असा आग्रह धरला आहे. कधीकाळी नाशिक जिल्हा बँक राज्यात व देशात आघाडीवरील बँक होती. लाखो शेतकरी तिचे सभासद आहेत. त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बँकेला वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक नफ्यात आहे. या बँकेप्रमाणे नाशिक जिल्हा बँकेच्या कारभारात सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा आहे.

– छगन भुजबळ (अन्न व नागरी पुरवठामंत्री)