नाशिक : राष्ट्रवादीने जनसन्मान यात्रेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बदललेली प्रतिमा संपूर्ण राज्यात नेण्याचे नियोजन केले आहे. राज्यात दौरा करताना ज्येष्ठ नेते शरद पवार हे अनेक घटकांशी संवाद साधतात. त्यांचे प्रश्न समजून घेतात. स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व प्रभावशाली व्यक्तींना ते अगदी नावासह ओळखतात. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने पुतणे अजित पवार हे देखील काकांच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत. दादांच्या कडक स्वभावातही बदल झाल्याचे पदाधिकाऱ्यांना जाणवत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने त्यांची प्रतिमा उजळविण्यासाठी कंबर कसली आहे.

राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने अजित पवार गटाची धुळधाण उडवली. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याकडून सुनेत्रा पवार यांना पराभूत व्हावे लागले. ज्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे सर्वाधिक आमदार आहेत, ती जागाही महायुतीने गमावली. अजित पवार गटाचा राज्यात एकमेव खासदार निवडून आला. या निकालातून धडा घेत पक्षाने अर्थसंकल्पातील योजनांमधून लाडकी बहीण ते शेतकरी, युवावर्ग, दूध उत्पादक, मुस्लीम बांधव, मातंग समाज अशा सर्व घटकांना आपलेसे करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. योजनांची जंत्री मांडत अजितदादांना घराघरात पोहोचविण्याची धडपड होत आहे. महत्वाची बाब म्हणजे, जनसन्मान यात्रेचा प्रकाशझोत केवळ अजित पवार यांच्यावर राहील, याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यामुळे या यात्रेतील मेळावे, सभांमध्ये उपस्थित मंत्री वा अन्य ज्येष्ठ नेत्यांना बोलण्याची संधी मिळत नाही. यात्रेत अजितदादा महिला, युवक, शेतकरी, द्राक्ष-कांदा उत्पादक, पैठणी निर्मिती करणारे कारागीर, उद्योजक आदींशी स्वतंत्रपणे संवाद साधत आहेत.

Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
I have responsibility of holding big post of state says Jayant Patil
राज्याचे मोठे पद सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर- जयंत पाटील
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Rajshree Ahirrao, Devalali, Mahayuti Devalali,
नाशिक : देवळालीत महायुतीतील मतभेद मिटता मिटेना, अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाचा प्रचार
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

आणखी वाचा-पश्चिम बंगालवर सहा दशके राज्य करणाऱ्या डाव्यांचा शेवटचा नेता हरपला; अशी होती बुद्धदेव भट्टाचार्य यांची कारकीर्द

लाडक्या बहीण योजनेवर प्रकाशझोत ठेऊन महिला वर्गात मत पेरणी केली जात आहे. यात्रेतील कार्यक्रमांचे स्वरुप बदलले. व्यासपीठ गुलाबी रंगसंगतीने सजविलेले असते. फलकावर अजितदादांची भव्य प्रतिमा आणि त्यांचा वादा अधोरेखीत केलेला असतो. प्रारंभी रक्षाबंधनाचा कार्यक्रम होतो. स्थानिक आमदार प्रास्ताविक करतात. मग इतर कुणाचेही भाषण न होता अजितदादा थेट उपस्थितांशी संवाद साधतात. दिंडोरीत आमदार नरहरी झिरवळ यांनी बोलण्याच्या ओघात दादांना वेगळ्या खुर्चीवर पाहण्यासाठी ही यात्रा असल्याचे सांगून टाकले.

आणखी वाचा-सत्तेचा निर्णय महिलांच्या हाती! जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन

अजित पवार यांची वक्तृत्व शैलीही बदलली असून त्यांचा करडा आवाज बराच सौम्य झाला आहे. रस्त्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनी वा ज्येष्ठ महिलांशी ते स्वत:हून संवाद साधतात. महिलांना आश्वस्त करतात. भाऊ, मुलगा समजून आशीर्वाद मागतात. महायुतीत सहभागी झाल्यानंतर दादा प्रथमच पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शनासाठी गेले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांचे बदललेले रुप यात्रेत दिसत आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा आमदार आहेत. कृषिबहुल भागात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. काकांना शह देण्यासाठी अजितदादांनी शेतकरीच नव्हे तर, महिला व अन्य घटकांशी संवादाचा मार्ग अनुसरला आहे. पदाधिकाऱ्यांना देखील अजितदादा वेगळे वाटत आहेत. आधी दादा कडक स्वभावाचे होते. त्यांच्याशी बोलताना भीती वाटायची. परंतु, आता त्यांच्या स्वभावात वडीलधारीपणा जाणवतो, असे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांचे निरीक्षण आहे.