नवी दिल्ली : राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अटीतटीचा आणि थेट संघर्ष सुरू असतानाच शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात अजित पवारांच्या बारामती मतदारसंघामधील प्रचारावरही आक्षेप घेतले गेले असून त्याची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निवडणूक प्रचारामध्ये घड्याळ या निवडणूक चिन्हाचा वापर करताना प्रत्येक वेळी अस्वीकरण अटीला बगल दिली जात नसल्याच्या तक्रारीचा शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा केला जात आहे. बुधवारच्या सुनावणीमध्येही शरद पवार गटाच्या वकिलांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची दखल न्यायालयाने घेतली. सर्वोच्च न्यायालयातील न्या. सूर्य कांत, न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. उज्जल भूईया यांच्या खंडपीठाने बुधवारी अस्वीकरण आदेशाचे पालन न केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला धारेवर धरले.

हेही वाचा >>>नवाब मलिक वि. अबू आझमी: मानखूर्दमध्ये दोन मुस्लीम नेत्यांच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाला लाभ मिळणार?

बारामती मतदारसंघातील प्रचाराचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने थेट अजित पवार यांच्याकडे अंगुलिनिर्देश केला. त्याचीही गंभीर दखल खंडपीठाने बुधवारी सुनावणीदरम्यान घेतली. बारामतीमध्ये स्वत:च अजित पवार त्यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार असून त्यांच्या प्रचारादरम्यानदेखील अस्वीकरणाची न्यायालयाची अट पाळली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला गेला. त्यावर, अजित पवारांकडून अस्वीकरणाच्या अटीचे पालन निवडणूक प्रचारदरम्यान का केले जात नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली.

‘निवडणूक प्रचारामध्ये वापरल्या गेलेल्या वाहनावरील फलकांवर अस्वीकरण कुठे दिले आहे हे सांगा’, असा प्रश्न न्या. सूर्य कांत यांनी अजित पवार गटाचे वकील बलबीरसिंह यांना केला.

हेही वाचा >>>त्र्यंबकनगरीत पूजाअर्चेसाठी उमेदवारांची गर्दी वाढली

अस्वीकरण अनिवार्य

घड्याळ चिन्हाचा वापर न्यायालयाच्या अंतिम निकालावर अवलंबून आहे. तोपर्यंत तात्पुरत्या काळासाठी घड्याळ चिन्हाच्या वापराची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे, अशा स्वरूपाचे अस्वीकरण प्रत्येक जाहिरातीमध्ये देणे अनिवार्य आहे. मात्र अजित पवारांकडून त्याचे पालन होत नाही, हा मुद्दा खंडपीठाने ग्राह्य धरला.