पिंपरी : पिंपरी-चिंचवड या अजित पवार यांच्या एकेका‌ळच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा शहर अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करायची याचा तिढा गेल्या १५ दिवसांत सुटू शकलेला नाही. शहराध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असलेल्यांना मात्र आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे शहराध्यक्षाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या अजित गव्हाणे यांनी भोसरी मतदारसंघ महायुतीत भाजपला सुटेल असे गृहीत धरून १६ जुलै रोजी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी समर्थक माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शहराध्यक्षानेच पक्ष सोडल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आणखी पडझड होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवकांची पुण्यात बैठक घेतली. शरद पवारांच्या मेळाव्यानंतर दुसऱ्याच दिवशी शहरात येत कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला. शहराध्यक्ष गव्हाणे एकटेच राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात गेले. महिला, युवक आघाडी, विविध सेलचे पदाधिकारी पक्षासोबतच असून, अध्यक्षपदासाठी काही नावे आली आहेत. त्यांपैकी कोणाला अध्यक्ष करायचे याची चाचपणी करत असून, लवकरच अध्यक्षाची नियुक्ती केली जाईल, असे पवार यांनी सांगून दहा दिवस झाले. परंतु, अद्याप शहराध्यक्षाची नियुक्ती झालेली नाही.

हे ही वाचा… संघकार्यावरील आक्षेप असंविधानिक; राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचे मत

शहराध्यक्षपदासाठी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, जगदीश शेट्टी, नाना काटे, भाऊसाहेब भोईर, श्याम लांडे यांची नावे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुचविल्याचे सांगितले जाते. त्यांपैकी बनसोडे विधानसभा लढणार असून, बहल यांना राज्यपालनियुक्त आमदारकी देण्याची मागणी आहे. तर, काटे, भोईर हे चिंचवडमधून निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले जाते. महायुतीत चिंचवड मतदारसंघ भाजपकडे कायम राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या पक्षाकडून निवडणूक लढविण्याची वेळ आली, तर दोन महिन्यांसाठी शहराध्यक्षपद कशाला घ्यायचे, अशी त्यांची भूमिका असल्याचे समजते.

हे ही वाचा… मुस्लीम कट्टरपंथी ते कावड सेवक; उत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रमुख चेहरा, कोण आहेत इम्रान मसूद?

शहराध्यक्षपदासाठी काही नावे सुचविली आहेत. अजित पवार यांच्याकडून शनिवारपर्यंत शहराध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल, अशी अपेक्षा आहे. – योगेश बहल, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस