Ajit Pawar Devendra Fadnavis Equations: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाले आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं. एग्झिट पोल्सनं महायुतीच्या विजयाचा अंदाज आधीच वर्तवला असला, तरी एवढा मोठा विजय युतीच्या पारड्यात पडेल, याची कल्पना कुणीही केली नव्हती. अगदी देवेंद्र फडणवीसांनीही या निकालांबाबत अभूतपूर्व निकाल असल्याचं भाष्य केलं होतं. पण सत्ता महायुतीची येणार असली तरी मुख्यमंत्रीपदी कोण बसणार? याबाबत निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवस उलटून गेले तरी अद्याप निर्णय होऊ शकत नसल्याचं चित्र आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला वाढता पाठिंबा असला तरी दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधून एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदासाठीची इच्छा व्यक्त होताना दिसत आहे.

निकाल जाहीर झाल्यापासून तिन्ही पक्षांमधील कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते आपापल्या प्रमुख नेत्याला मुख्यमंत्रीपद मिळावं अशी इच्छा असल्याचं मत जाहीरपणे मांडत आहेत. दुसरीकडे प्रमुख नेते सर्वच कार्यकर्त्यांना आपल्या प्रमुखानं मुख्यमंत्री व्हावं असं म्हणत सारवासारव करताना दिसत आहेत. पण निकालांनंतर दोन दिवस होऊनही मुख्यमंत्रीपदावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नसून त्यापुढे सत्तावाटप अर्थात खातेवाटपाच्या मुद्द्यावरदेखील चर्चेच्या फेऱ्या होण्याची शक्यता आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा कल एकनाथ शिंदेंपेक्षा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, असा दिसू लागला आहे. त्यामागे काही राजकीय समीकरणं असण्याचीही शक्यता आहे.

pm modi wished eknath shinde on his birthday in marathi
मोदी साहेबांनी मला आठवणीने फोन केला आणि म्हणाले… एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात वक्तव्य
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
कोण आहेत प्रताप सरनाईक; मुख्यमंत्र्यांनी शिवसेना शिंदे गटाचे पंख छाटले का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांची शिंदे गटावर कुरघोडी? कोण आहेत प्रताप सरनाईक?
Maharashtra Disaster Management Authority Mahayuti govt
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात एकनाथ शिंदेंऐवजी अजित पवारांची निवड; महायुतीत नाराजी कायम?
Shiv Sena mouthpiece claims tension between Fadnavis and Shinde
एसटी महामंडळातील नियुक्तीवरून मुख्यमंत्र्यांची शिंदे गटावर कुरघोडी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”

पहाटेच्या शपथविधीपासूनच सूत जुळले!

देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी २०१९ मध्ये भल्या सकाळी घेतलेल्या शपथविधीपासूनच त्या दोघांमध्ये चांगलं समीकरण जुळल्याचं बोललं जातं. त्यातच २०१९ च्या निवडणुकांपूर्वी आणि त्यानंतरच्या मविआच्या सत्ताकाळातही शिवसेनेतील शिंदे गटानं सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसला व पर्यायाने अजित पवारांना लक्ष्य केलं होतं. सत्तेत असतानाही खुद्द एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसण्यावर आक्षेप नोंदवले होते. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून देवेंद्र फडणवीसांना समर्थन देण्याची भूमिका स्वाभाविक असल्याचं बोललं जात आहे.

फडणवीस मुख्यमंत्री, शिंदेंशी बरोबरी!

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले, तर सरकारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरीच्या नात्याने बसू शकतील, असं अजित पवार गटाचं समीकरण दिसून येत आहे. भाजपानं १३२ जागा जिंकत फार मोठी उडी घेतली आहे. पण शिवसेना (५७ जागा) व राष्ट्रवादी काँग्रेस (४१ जागा) हे दोन मित्रपक्ष महायुतीच्या समीकरणात एकमेकांच्या जवळपास आहेत. जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर भाजपा संख्याबळाच्या जोरावर आणि शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या जोरावर पुन्हा एकदा युती सरकारमध्ये वरचढ ठरण्याची शक्यता आहे.

Maharashtra Election Winner Candidate List: राज्याच्या २८८ मतदासंघांमध्ये नेमकं काय घडलं? वाचा विजेत्यांची संपूर्ण पक्षनिहाय यादी!

भाजपात व महायुतीमध्ये घडणाऱ्या अंतर्गत घडामोडी पाहाता देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यांच्या नावाला समर्थन दिलं आहे. यासंदर्भात एकाच वेळी मुंबईत व दिल्लीत बैठकांचं सत्र चालू आहे. खुद्द शिंदे-फडणवीसांच्याही दिल्ली वाऱ्या झाल्या. त्यामुळे एकीकडे फडणवीसांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नावांची उपमुख्यमंत्री म्हणून घोषणा केली जाईल, असे संकेत मिळत आहेत.

देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्यावर एकमत झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकांमध्ये ठरल्याबाबत पक्षाच्या नेत्यांनी पुष्टी दिली आहे. खुद्द छगन भुजबळांनी “देवेंद्र फडणवीसांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून विरोध करण्याचं आमच्याकडे काही कारणच नाही”, असं विधान निकालाच्या दिवशी केलं होतं. आपल्या सहमतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनं आधीच भाजपा नेतृत्वाला कळवल्याचंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदानंतर खातेवाटपामध्ये कशाप्रकारे ४३ मंत्रीपदांचं वाटप केलं जातं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

Story img Loader