दयानंद लिपारे

कोल्हापूर : तीन तालुक्यात पुरताच मर्यादित पक्ष या टीकेतून बाहेर पडत राष्ट्रवादीचा जिल्हाभर विस्तार व्हावा यासाठी आता पक्षनेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. संघटन बांधणी बरोबरच विधानसभा निवडणुकीतही अधिक आमदार निवडून यावेत अशी रणनीती आखली आहे. या निमित्ताने तरी जिल्ह्यातील पक्ष विस्ताराचे उत्तरायण खरेच सुरू होणार का हा प्रश्न आहे.

Increase in the number of people obtaining international driving licenses pune news
पुणे: आंतरराष्ट्रीय वाहनचालक परवाने काढणाऱ्यांमध्ये वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
investment opportunities in India,
साहसी भांडवलदारांसाठी संधीचा सुकाळ
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : आम्ही गावकी, भावकी कधीच सोडली
bmc s Divisional Office formed Forest Rights Committee
गोराईमधील आदिवासी पाड्यांतील रहिवाशांची वनहक्क समिती, येऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी समिती
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात दोन खासदार, पाच आमदार, तीन मंत्री अशी भरभक्कम स्थिती होती. पुढे दिग्गज नेत्यांचे निधन, गटबाजी , संघटन बांधणीतील विस्कळीतपणा अशा कारणामुळे पक्षाला उतरता कळी लागली. गेल्या पंधरा वर्षात तर पक्षाचे कायम दक्षिणायन सुरू राहिले. कागल, चंदगड, राधानगरी- भुदरगड येथेच अनुक्रमे मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या रूपाने पक्षाचे ठळक अस्तित्व दिसले. शिरोळ तालुक्यात पूर्वी राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यामुळे पक्ष स्थिती मजबूत होती. विधानसभा निवडणुक अपक्ष निवडून येत त्यांनी मातोश्री मार्गे शिंदेसेनेसोबत जाणे पसंत केले. त्यामुळे शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगले, पन्हाळा, कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण, करवीर येथे पक्षाचे अस्तित्व तोळामासा राहिले. पूर्वी शरद पवार यांनीही स्थानिक नेतृत्वास पक्ष विस्ताराच्या सूचना केल्या होत्या. वर्षभरापूर्वी पन्हाळा तालुक्यात अजित पवार यांनीही जिल्हाभर पक्ष वाढण्याची गरज व्यक्त करतानाच गद्दारांना जागा दाखवून देऊ, असा इशारा दिला होता. आता अजितदादांच्या लेखी गद्दार कोण हाच प्रश्न आहे.

हेही वाचा… ‘साहेब’ तुम्ही हवे होतात…पडझडीच्या काळात काँग्रेस नेत्यांना विलासरावांची आठवण

मुश्रिफांवर जबाबदारी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन पक्षाचा जिल्हा असल्याची खोचक टीका केली होती. त्यावर अजित पवार यांनी पक्ष साडेतीन जिल्ह्यांचा असेल तर फडणवीस यांनी आमची चिंता करू नये, असे प्रत्युत्तर दिले होते. राष्ट्रवादीचा राज्यपातळीवर असा अनादर केला जात असताना इकडे कोल्हापुरात पक्ष स्थिती तीन विधानसभा मतदारसंघात पुरती सीमित राहिली. यातून अनेकदा जिल्ह्यातील नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनाही टीकेला सामोरे जावे लागले. याचा इन्कार करत मुश्रीफ यांना जिल्हाभर कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा तपशील द्यावा लागत आहे.

आता तर राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली आहेत. जिल्ह्यात शरद पवार यांचा गटाकडे पक्षातील वरिष्ठांचा अधिकतम समावेश आहे. तुलनेने अजितदादा गटाला सत्तेचे टॉनिक मिळाले आहे. चौकशीचा ससेमिरा सुटलेला, मंत्री – पालकमंत्री पद, निधीचा खळाळता ओघ, कामांना मिळालेली गती अशा गोष्टी जुळून आल्याने मुश्रीफ यांनी संघटन बळकटीकरणाकडॆ लक्ष दिले आहे. गडहिंग्लज येथील दिवंगत आमदार श्रीपतराव शिंदे गटातील नगरसेवक गळाला लावून पहिले पाऊल टाकले आहे. कोल्हापूर- इचलकरंजी या महापालिके क्षेत्रात पैस वाढवला जात आहे. गेले अनेक वर्ष निष्क्रिय जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना वेळीच दूर करीत जिल्हा बँकेतील संचालक पन्हाळा तालुक्यातील बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्याकडे जबाबदारी सोपवली असून त्यांनी पक्ष बांधणीला नेटकी सुरुवात केली आहे.

हेही वाचा… ‘भारतरत्न’ पी. व्ही. नरसिंह राव यांचा रामटेकमधील पुतळा अजूनही अनावरणाच्या प्रतीक्षेत !

अजितदादांचे लक्ष

महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांचे गेल्या पंधरवड्यात कागल, चंदगड या भागात त्यांचे दौरे झाले. तथापि, जिल्ह्यातील कार्यकर्ते पवार, मुश्रीफ यांनी पक्ष कमकुवत असलेल्या जिल्ह्याच्या उत्तरेकडे अधिक लक्ष घालण्याची गरज व्यक्त करताना दिसत आहेत. चंदगड येथे अजित पवार यांनी नूतन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्याकडून पक्ष बांधणीचा आढावा असता पाटील यांनी जेमतेम दहा दिवसाच्या कालावधीत बहुतांशी तालुक्यात संघटनात्मक बैठका घेऊन कार्यकारिणी जाहीर करण्याची तयारी केली असल्याचे सांगितले. जिल्ह्यात अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसची समतोल बांधणी, कमकुवत भागाकडे अधिक लक्ष, कार्यकर्त्यांशी संवाद यावर भर दिला आहे. नेते हसन मुश्रीफ यांच्या समवेत सर्व विधानसभा मतदारसंघांचा दौरा करण्याचे नियोजन आहे. ज्या तालुक्यांमध्ये बैठका घेतल्या तेथे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हा बँकेत पणन (मार्केटिंग) मतदार संघातून निवडून आल्याने ज्या तालुक्यात पक्षाची बैठक होते तेथे स्थानिक पणन संस्थांचीही मदत मिळत आहे. पक्षाची वाढ हळूहळू पण दमदारपणे होत आहे, असा दावा बाबासाहेब पाटील करताना दिसत आहेत.

Story img Loader