विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे. नागपूर अधिवेशनापर्यंत जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. याप्रकरणावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
का करण्यात आलं निलंबन?
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी ४४ वेळा फोन कॉल केल्याचा दावा केला. राहुल शेवाळेंनी केलेल्या दाव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा काढून विधानसभेत एसआयटी चौकशी मागणी केली. यावरून विधानसभा कामकाज सात वेळा तहकूब करण्यात आलं होतं.
हेही वाचा : दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा
सत्ताधारी पक्षाकडून दिशा सालियान मृत्यू प्रकरणावर चर्चा करण्यात आली. याच प्रकरणावर विरोधी पक्षाने आमदार भास्कर जाधव यांना बोलून देण्याची विनंती करण्यात आली. ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. तेव्हा विरोधी पक्षाने एकच गोंधळ घातला. यावेळी बोलताना जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून “तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका,” असं म्हटलं.
यावरून सत्ताधारी आमदारांनी जयंत पाटील यांना निलंबित करण्याची मागणी केली. यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी बैठक झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षांविषयी असंवैधानिक शब्दप्रयोग केल्याचा आरोप जयंत पाटलांवर ठेवण्यात आला. मग, विधानसभा अध्यक्षांनी जयंत पाटलांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई केली आहे.
हेही वाचा : “अध्यक्ष महोदय हे काय चाललंय?”, अजित पवारांनी भर सभागृहात विचारला जाब; सरकारला पाठिशी घालण्याचा आरोप!
यावर अजित पवारांनी भाष्य करत दिलगिरी व्यक्त केली आहे. “विरोधी असो किंवा सत्ताधारी पक्ष यांच्याकडून अजानतेपणाने, असे शब्द जाऊ नये या मताचे आम्ही सर्वजण आहोत. हे घडायला नको होतं. चर्चा करताना अजानतेपणाने, असा शब्द जातो, नंतर सर्वांच्या लक्षात येत हे बरोबर नाही.”
“विधानसभेत सत्ताधाऱ्यांप्रमाणे विरोधी पक्षाला आपले विचार मांडण्याची संधी मिळाली की मार्ग निघतो. आम्ही एवढचं म्हणत होतो, भास्कर जाधवांना बोलून द्यावं. पण, जे काही घडलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे, जेव्हा एखादं चुकतं तेव्हा पुढं गेलं, तर त्याच्यातून चांगलं वातावरण तयार व्हावं,” असं अजित पवारांनी सांगितलं.