सुहास सरदेशमुख

औरंगाबाद: जवळच्या कार्यकर्त्यांना बळ देणारे कार्यक्रम आखत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अजित पवार यांनी मराठवाड्यात नवी बांधणी सुरू केली आहे. अहमदपूर, वैजापूर, वसमत, पैठण आणि पाथरी या मतदारसंघातील त्यांच्या राजकीय दौऱ्यात अजित पवार हेच मुख्यमंत्री पदाचे राष्ट्रवादीचे दावेदार आहेत, असे रुजविण्याचे प्रयत्न आवर्जून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पाथरी वगळता राष्ट्रवादीतील गटबाजीचा प्रश्न कोठे चर्चेत आला नाही. वैजापूरमध्ये नव्याने राष्ट्रवादीमध्ये आलेले पंकज ठोंबरे, शिरडशहापूरमधील सभेत आमदार राजू नवघरे , पैठणमध्ये संजय वाघचौरे यांना पुढील काळातील विधानसभा निवडणुकीत बळ मिळेल अशी रचना या दौऱ्यातून राष्ट्रवादी कॉग्रसने केली.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!

एका बाजूला भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी आणि विधानसभेसाठी राष्ट्रवादीची बांधणी असा राजकीय कार्यक्रमांचा धडका सुरू आहे. ज्या मतदारसंघात शिवसेनेची पूर्वी ताकद होती. त्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी मराठवाड्यात दौरा केला. मात्र, ‘ आपल्या कार्यकर्त्यांना’ बळ देत अजित पवार यांचा दौरा नव्या बांधणींचा भाग असल्याचे मानले जात आहे. भाजप विरोधाची मोट बांधून पुन्हा सरकार आलेच तर त्याचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजित पवार हेच असतील अशी चर्चा आमदार निलेश लंके यांनी सुरू केल्यानंतर तो चेहरा अधिक आश्वासक आहे, अशी चर्चा आवर्जून पेरली जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथील जाहीर कार्यक्रमात आमदार राजू नवघरे यांनी तसे जाहीर वक्तव्य केले. ‘पहाटचा शपथविधी’च्या वेळी समर्थक म्हणून बरोबर असणारे अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या ताब्यातील साखर कारखान्यात उत्पादित साखर पोत्याचे पूजन अजित पवार यांनी केले. या सर्व मतदारसंघात शेतकऱ्यांचे मेळावेही घेण्यात आले.

हेही वाचा… कोणता झेंडा घेऊ हाती?

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघात भाऊसाहेब चिकटगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार म्हणून पंकज ठोंबरे यांना पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते. या कामी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे वैजापूर, गंगापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेसची ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. परभणी जिल्ह्यातील पाथरी वगळता अन्यत्र गटबाजीची तशी फारशी चर्चा नव्हती. पाथरी हा मतदारसंघ कॉग्रेसचा असून सुरेश वरपूडकर यांच्याकडून हा मतदारसंघ काढून घेऊन तो राष्ट्रवादीच्या ताब्यात घ्यावा अशी सूचना अजित पवार यांना जाहीरपणे करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आधी स्थानिक कुरघोड्या बंद करा, मग जागा घेण्याचा विचार करू असेही ते म्हणाले. पण मराठवाड्यातील दौऱ्यांमध्ये भविष्यातील मुख्यमंत्री पदाचा राष्ट्रवादीचा दावेदार अशी त्यांची प्रतिमा आवर्जून घडविली जात असून त्या अनुषंगाने बांधणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा… महापालिका निवडणूक लांबल्‍याने इच्‍छुकांमध्‍ये अस्‍वस्‍थता

राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना विधानसभा निवडणुकांवर लक्ष्य ठेवून दौरे आखत आहे. भाजपची रणनीती मात्र लोकसभा निवडणूक असल्याने त्यांचे प्रयत्न जिल्हाभर मतदानकेंद्रनिहाय करण्याची प्रक्रिया आता वेगाने हाती घेतली जात आहे. अशा काळात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभांमुळे नवी बांधणी सुरू असल्याचे मानले जात आहे.