नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. महायुतीच्या अधिकाधिक जागा जिंकायच्या एवढेच ठरले होते. त्यामुळे कुठल्या एका पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपद दिले जाईल असे आश्वासन दिलेले नव्हते, असे राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

शिवसेना-शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद कायम राहण्यासाठी गेले काही दिवस प्रयत्न करत होते. अखेर या स्पर्धेतून शिंदेंनी बुधवारी माघार घेतली. मात्र पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील असे आश्वासन देण्यात आले होते, असा दावा शिंदे गटाकडून केला गेला होता. हा दावा अजित पवार यांनी फेटाळून लावला. विधानसभा निवडणुकीपूर्वी फक्त जागावाटपावर चर्चा झाली होती, महायुतीच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा उपस्थित झाला नव्हता, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप

हेही वाचा >>>नागपुरात मंत्रिपद शहराला की ग्रामीणला?

दिल्लीत निवडणूक लढवणार!

महाराष्ट्र, नागालँड, अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहे. मात्र राष्ट्रीय पक्षाचा गमावलेला दर्जा परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी अधिकाधिक राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक लढवली जाईल. आगामी फेब्रुवारीमध्ये दिल्लीत विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे, अशी माहिती पक्षाचे नेते व राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांनी दिली. डिसेंबरमध्ये दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.