सिद्धेश्वर डुकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना-वंचित बहुजन आघाडीतील युतीचा चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी नवे मित्र जोडले तर त्या त्या पक्षांनी आपल्या वाट्याच्या जागा मित्रांना सोडाव्यात, असा तोडगा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुचविला आहे. पवार यांच्या तोडग्यामुळे ‘मविआ’तील आगामी निवडणुकीतील जागा वाटपाचा गुंता सुटण्यास मदत होणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यापैकी कोणीही अन्य कोणत्याही पक्षासोबत युती अथवा आघाडी करत असेल तर त्या घटकपक्षाने त्याच्यासोबत येणाऱ्या पक्षाची सर्व जबाबदारी घ्यावी, असा प्रस्ताव अजित पवार यांनी मांडला आहे.

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात सध्या बोलणी सुरू आहेत. मविआत वंचित बहुजन आघाडीने यावे यासाठी अँड. प्रकाश तथा बाळासासेब आंबेडकर व उद्धव ठाकरे यांच्यात दोनदा बैठक झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि वंचितचे नेते यांच्यात बैठका सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते पवार यांचा तोडगा महत्वाचा मानला जातो. पवार यांनी केलेल्या वक्तव्यानुसार वंचितची शिवसेना ठाकरे गटाबरोबर युती झाली तर राष्ट्रवादी अथवा काँग्रेस पक्ष यांना वंचितसाठी आगामी निवडणुकांत जागा सोडण्याची गरज नाही. शिवसेनेच्या वाट्यातून वंचितला जागा सोडल्या जाव्यात. राज्यात वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीबरोबर झाल्यास  तर दलित व बहुजन मतांचा लाभ  लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळू शकतो,असा कयास आघा़डीच्या नेत्यांनी बांधला आहे.

हेही वाचा >>> शिंदे-कवाडे युतीचा राजकीय लाभ कोणाला?

पुर्वानुभव पाहता प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणी करून त्यांना मविआत सहभागी करून घेणे,ही सोपी गोष्ट नाही,असे काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. २०१९ च्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार उभे राहिल्यामुळे लोकसभेच्या ८ ते १२ जागांवर आघाडीचे उमेदवार पराभूत झाले होते. अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता.तर राष्ट्रवादीचे परभणी लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर हे जेमतेम २५-३० हजार मतांच्या  फरकाने पराजित झाले होते. वंचितच्या उमेदवारांने लाखांच्या आसपास तेथे मते घेतली होती. त्यामुळे वंचितचे महत्व काँग्रेस व राष्ट्रवादी ओळखून असले तरी  जागा वाटपाबाबत बाळासाहेबांची ताठर भुमिका आणि तर्क यावर दोन्ही काँग्रेसला तोडगा सापडला नव्हता. विशेषतः काँग्रेस पक्षासोबत शेवटपर्यंत बैठका होवूनही वंचित पक्ष बरोबर आला नाही. 

हेही वाचा >>> सोलापूर आणि बारामतीच्या पाणी प्रश्नावर भाजपची संदिग्ध भूमिका

या पार्श्वभूमीवर उभी फुट पडून कमकुवत झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचितपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यालाही बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रतिसाद देत  लवकरच अशी युती होईल,याचे संकेत दिले आहेत.  स्थानिक स्वराज्य संस्था अथवा लोकसभा अथवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीत जागा वाटपावारून महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांचे अन्य घटक पक्षावरून वाद होण्याची शक्यता कमी आहे. कारण वंचितची ठाकरे यांच्या पक्षासोबत युती झाली तर ठाकरे यांच्या गटाला जेवढ्या जागा मिळतील त्यातून वंचितला जागा मिळणार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar solution for seat allocation in mahavikas aghadi print politics news ysh
Show comments