उत्तर प्रदेश लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाने आझमगड आणि रामपूर हे बालेकिल्ले गमावल्यानंतर दोन महिन्यांनी, पक्षाचे अध्यक्ष अखिलेख यादव हे २३ ऑगस्ट रोजी आझमगडला तुरुंगात असलेल्या ‘बाहुबली’ तथा पक्षाचा स्थानिक आमदार रमाकांत यादव याची भेट घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

सपाचे आझमगड जिल्ह्याचे अध्यक्ष हवालदार यादव म्हणाले की, अखिलेश हे २३ ऑगस्ट रोजी रमाकांतची भेट आझमगड जिल्ह्यातील तुरुंगात घेणार आहेत, आपल्या भेटीचा आणि पक्षाचा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करण्यात येतो आहे.
रमाकांत यादव, हे सध्या आझमगड जिल्ह्यातील फूलपूर पवई येथील सपा आमदार आहेत. २४ वर्षे जुन्या हत्या प्रकरणात काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी स्थानिक न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. त्याच्या त्रासात भर म्हणून यंदा फेब्रुवारी महिन्यात बनावट दारूच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Shiv sena Sanjay Shirsat
Santosh Deshmukh Case : शिंदेंच्या शिवसेनेने घेतलं संतोष देशमुखांच्या कुटुंबाचं पालकत्व; संजय शिरसाटांनी दिली मोठी माहिती
Image of Uttam Jankar
Ajit Pawar : “…तर मी अजित दादांबरोबर जाईन”, शरद पवार यांच्या आमदाराचे मोठे विधान
chhagan bhujbal meets devendra fadnavis
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीसांना भेटून आल्यावर भुजबळ म्हणतात, “मी त्यांना सगळं सांगितलं आहे, त्यांनी ८-१० दिवस…”
Sanjay shirsat marathi news
मंत्री संजय शिरसाट यांचा रोख अब्दुल सत्तारांवर
Ajit Pawar Statement About Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Murder : अजित पवारांचं संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत भाष्य; “सिव्हिल सर्जन म्हणाला, पोस्टमॉर्टेम करताना आजवर इतकी वाईट…”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फूलपूर पवईचे पाच वेळा आमदार आणि आझमगडचे चार वेळा खासदार राहिलेल्या रमाकांतवर सुमारे दोन डझन गुन्हे दाखल आहेत. त्याचा मुलगा अरुण यादव, फूलपूर पवईचा भाजप विद्यमान आमदार असला तरी भाजपने अरुण यांना तिकीट नाकारत २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सपाने रमाकांतला या जागेवरून उमेदवारी दिली. रमाकांतचा मतदारसंघावर असलेला वरचष्मा पाहता आपली पकड घट्ट करण्यासाठी सपाने हालचाली सुरू केल्या आहेत.

सपाने रमाकांतच्या बचावाचा पवित्रा घेत, योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारवर “छळ” केल्याचा आरोप केला आहे. जर अखिलेश यांनी तुरुंगात रमाकांतची भेट घेतली तर यादव मतदारांना आणि पक्ष कार्यकर्त्यांना सकारात्मक संदेश जाईल, लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून पराभव पत्करल्यानंतर त्यांच्यात नैराश्याचे वातावरण होते. रमाकांतला सशक्त राजकीय कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. आझमगड आणि पूर्व युपीलगतच्या जिल्ह्यांत त्याचा प्रभाव आहे. रमाकांतचा मोठा भाऊ लल्लन प्रसाद याची आझमगडमधील सारवा गावचा प्रमुख म्हणून सातवेळा नेमणूक करण्यात आली तर दुसरा भाऊ उमाकांत यादव जौनपूर जिल्ह्यातील मछलीसहारचा माजी खासदार आहे. पक्षाचा मतांचा आधार पाहता रमाकांतशी एकजूट दाखवणे महत्त्वाचे ठरते, अशी माहिती सपा नेत्याने दिली.

Story img Loader