उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २३ जून रोजी होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आझमगड आणि रामपूर येथे दोन प्रचारसभा घेतल्या होत्या. लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात योगी आदित्यनाथ स्वतः उतरले असताना दुसऱ्या बाजूला अखिलेश यादव यांनी मात्र प्रचारापासून स्वतःला दूर ठेवले आहे. मतदारसंघांचा दौरा करण्याऐवजी अखिलेश यांनी मतदारांना दोन्ही जागांवर पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुस्लिम आणि यादव समाजाची मते ही समाजवादी पक्षाची महत्वाची वोटबँक आहे. आझमगड आणि रामपूर हे दोन्ही मतदार संघ समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जातात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने या दोन्ही जागांवर विजय मिळवला होता. आझमगडमध्ये अखिलेश यादव आणि रामपूरमध्ये आझम खान विजयी झाले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर त्यांनी आपापल्या खासदरकीचा राजीनामा दिल्यामुळे पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली.समाजवादी पक्षाने आझमगडमधून अखिलेश यादव यांचे चुलतभाऊ आणि माजी खासदार धर्मेंद्र यादव यांना उमेदवारी दिली आहे तर रामपूरमधून आझम खान यांचे जवळचे सहकारी असीम राजा यांना उमेदवारी दिली आहे. 

मात्र, प्रचारात अखिलेश यांची उणीव स्पष्टपणे जाणवत होती. अखिलेश यांनी यापूर्वी लोकसभा पोटनिवडणुकीत प्रचार केला नव्हता, असे नाही. त्यांनी मार्च २०१८ मध्ये गोरखपूर आणि फुलपूर येथे सभांना संबोधित केले होते. तेव्हा सपा-बसपा युतीने लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव केला होता. परंतु पक्षाने यावेळी रामपूर आणि आझमगढ या दोन्ही ठिकाणी अखिलेश यांच्या अनुपस्थितीत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की अखिलेश यांनी प्रचारात सहभागी न होणे हा पक्षाच्या “रणनीतीचा भाग होता. भाजप आणि बसपासारख्या इतर राजकीय पक्षांचे राष्ट्रीय नेते पोटनिवडणुकीचा प्रचार करत नाहीत, अखिलेश हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. म्हणून आमच्या पक्षाने अखिलेश यांना पोटनिवडणुकीच्या प्रचारात न उतरवण्याचा निर्णय घेतला”. 

याउलट भाजपाने प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन्ही मतदारसंघात प्रचार सभांना संबोधित केले होते. सपाकडून या दोन्ही जागा हिसकावून घेण्यासाठी भाजपाने त्यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांना रामपूरमध्ये प्रचारात उतरवले होते. रामपूरमध्ये भाजपाने ओबीसी उमेदवार घनश्याम सिंग लोधी यांना एसपीच्या असीम राजा यांच्या विरोधात उभे केले आहे, तर पक्षाने पुन्हा एकदा भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव “निरहुआ” यांना आझमगडमध्ये उमेदवारी दिली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते अखिलेश यांच्याकडून मोठ्या फरकाने पराभूत झाले होते.