आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाकडून पक्षांतर्गत बदल करत पक्ष स्थानिक पातळीवर कसा मजबूत होईल, यावर विचारमंथन सुरू आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी पक्ष मजबुतीसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पक्षाने नियोजनही केले आहे. या शिबिरांदरम्यान पक्षाचे नेते कार्यकर्त्यांना विचारधारा, पक्षाची आगामी वाटचाल तसेच भाजपाच्या युक्तीवादाला कसे प्रत्युत्तर द्यावे, भाजपाचे हल्ले कसे परतवून लावावेत याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे निर्देश

या मोहिमेमध्ये पक्षातील वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या मतदारसंघात असलेल्या बूथ पातळीवरील समित्यांची पुनर्रचना करण्यास सांगितले आहे. तसेच बुथ पातळीवरील निष्क्रिय कार्यकर्ते तसेच दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्यासाठी समाजवादी पक्ष सोडलेल्या कार्यकर्त्यांच्या जागेवर नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एकूण सहा झोन असतील. प्रत्येक झोन सहा सेक्टर्समध्ये विभागण्यात आला आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये १० ते १२ बुथ युनिट्स असतील. प्रत्येक झोन पातळीवर प्रभारींना नवीन संघटनात्मक रचना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासह प्रत्येक लोकसभा मतदारसंघ प्रभारींना कार्यकर्ते, जनता, ग्रामीण भागातील नागरिकांशी संवाद साधण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

Kalpana Soren electoral campaign
Kalpana Soren: झारखंड विधानसभा निवडणुकीत कल्पना सोरेन यांची हवा; महिलांसाठीच्या योजना गेमचेंजर ठरणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
minister chandrakant patil opinion on next cm in the loksatta loksamvad program
मुख्यमंत्री कोण, याचा अंदाज बांधणे अशक्य; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
nitin gaikwad contesting election Deputy Chief Minister Devendra Fadnavis Nagpur South West Assembly constituency
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात चक्क ‘क्रेन ऑपरेटर’; खात्यात केवळ दोन हजार रुपये, दीड लाखांवर कर्ज…

हेही वाचा >> संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावर २० विरोधी पक्षांचा बहिष्कार; तीन महत्त्वाचे पक्ष मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहणार!

कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांसाठी शिबिरांचे आयोजन केले जाणार

विशेष म्हणजे प्रभारींना झोन पातळीवरील संघटनात्मक बदल येत्या ५ जूनपर्यंत करायचे आहेत. त्यानंतर प्रत्येक दोन मतदारसंघामध्ये एक याप्रमामे तरुण कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांसाठी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. या शिबिरांमध्ये वरिष्ठ नेते पक्षाची विचारधारा, भाजपा सरकारचे अपयश तसेच अन्य बाबींबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.

पक्षाची पुनर्रचना करण्याची गरज निर्माण झाली आहे- सुधीर पनवार

समाजवादी पक्षाने सुरू केलेल्या या मोहिमेबद्दल माजी मंत्री आणि कैराना मतदारसंघाचे प्रभारी सुधीर पनवार यांनी अधिक माहिती दिली आहे. “समाजवादी पक्ष हा जनाधारावर वाढलेला पक्ष आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पक्षाची विचारधारा, संवेदनशील राजकीय बाबींवर नव्याने बोलण्याची गरज निर्माण झाली आहे.. तसेच सध्याच्या आव्हानांबद्दल कर्यकर्त्यांशी चर्चे करणे गरजेचे आहे. त्यामुळे बुथ कमिटी तसेच प्रत्येक झोनमध्ये पक्षाची पुनर्रचना करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी मतदारसंघनिहाय प्रभारी नेमण्यात आले आहेत,” असे सुधीर पनवार म्हणाले आहेत.

हेही वाचा >> महाविकास आघाडीची पुण्यात वज्रमूठ सभेची तयारी सुरू

पक्ष बळकट करण्याची गरज निर्माण झाली

समादवादी पक्षाच्या या मोहिमेविषयी आणखी एका नेत्याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “आमचा पक्ष जनतेच्या पाठिंब्यावर उभा आहे. आम्ही मतदारांमध्ये भेद करत नाही. आम्ही धर्म, जात, लिंग, आर्थिक बाजू बघून भेदभाव करत नाही. मात्र सध्या माध्यमांकडून काही पक्षांना जास्त महत्त्व देण्यात येते. तर काही पक्षांना डावलण्यात येते. राजकाणात धर्माचा वापर करण्यात येत आहे. अनेक संस्थांचे भगवीकरण केले जात आहे. त्यामुळे आमच्यासारख्या पक्षांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. सध्या उत्तर प्रदेशचे राजकारण बदलले आहे. त्यामुळे पक्ष बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजवादी पक्ष यावर काम करत आहे,” असे या नेत्याने सांगितले.

कोणत्या नेत्यांवर कोणत्या मतदारसंघांची जबाबदारी

रायबरेली आणि अमेठी मतदारसंघावर याआधी काँग्रेसचे प्राबल्य राहिलेले आहे. मात्र यावेळी समाजवादी पक्षाने या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले आहे. आमदार इंद्रजित सरोज यांना रायबरेली आणि कौशंबी, प्रतापगड या मतदारसंघाचे प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे. अमेठी मतदारसंघात आमदार सुनिल संजन, आनंद भादुरिया, माजी आमदार अरुण वर्मा यांना प्रभारी नेमण्यात आले आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि दलित समाजाचा चेहरा असलेले अवधेश प्रसाद यांना अयोध्या मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आमदार लालजी वर्मा यांच्यावर आझमगड यासह इतर चार मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. समाजवादी पक्ष उत्तराखंडमधील हरिद्वार मतदारसंघात उमेदवार देणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी आमदार किरण पाल कश्यप यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.

हेही वाचा >> राज्य काँग्रेससाठी आता नवा प्रभारी नेमावा लागणार

कार्यकर्त्यांच्या घरांवर पक्षाचा झेंडा फडकवला जातोय

माजी आमदार आरके चौधरी यांनी समाजवादी पक्षाकडून पक्षबळकटीसाठी आणखी काय केले जात आहे? याबाबत माहिती दिली आहे. “संघटनात्मक बांधणीसह आम्ही अन्य बाबींवरही काम करत आहेत. आम्ही पक्षाच्या नव्या कार्यकर्त्यांना भेटत आहोत. तसेच या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरावर पक्षाचा झेंडा फडकवत आहोत. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढावे यासाठी झेंड्यासोबत आम्ही सेल्फीदेखील घेत आहोत,” असे चौधरी यांनी सांगितले.

समाजवादी पक्षालाही भाजपासारख्या पक्षरचनेची गरज

हेही वाचा >> के. चंद्रशेखर राव नांदेडमधून लोकसभा लढणार का?

“आमचा पक्ष हा केडर बेस पक्ष आहे. यादव समाजाची मतं ही आम्या पक्षाची ताकद आहे. यासह मुस्लीम तसेच ओबीसी समाजाचीही मतं आम्हाला मिळतात. आमचे सर्वोच्च नेतृत्व आणि आमच्या समाजवादी विचारधारेवर विश्वास ठेवून आम्हाला ही मते दिली जातात. मात्र भाजपा तसेच बसपा पक्षाची बुथ ते राज्य अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर संघटनात्मक रचना आहे. यामुळे या पक्षांना त्यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे सोपे होते. परिणामी भाजपासारख्या पक्षाला मतं जास्त मिळतात. तसेच ते सत्ताविरोधी भावनेमुळे होणारे नुकसान भरून काढण्यास सक्षम ठरतात. त्यामुळे भाजपाच्या विरोधात लढायचे असेल तर समाजवादी पक्षालाही अशाच रचनेची गरज आहे,” असे मत आणखी एका नेत्याने व्यक्त केले.