अकोला : लोकसभा निवडणूक तोंडावर असतांना अद्यापही प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट झालेले नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी अकोल्यात मॅरोथॉन बैठक घेतली. नव्यांमुळे जुन्यांचे नुकसान होणार नसल्याचे सांगत त्यांनी निष्ठावानांना धीर देण्याचा प्रयत्न केला. उमेदवारीवरून त्यांनी धक्कातंत्राचे संकेत तर दिले नसावे, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल आता केव्हाही वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. इच्छुकांकडून देखील मोर्चेबांधणी केली जात आहे. भाजप पक्ष सुमारे वर्षभरापासून कामाला लागला. अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. भाजप, काँग्रेस व वंचित आघाडीत झालेल्या तिरंगी लढतीमध्ये भाजपला थेट लाभ झाल्याचा अकोल्याचा इतिहास आहे. २००४ पासून सलग चार लोकसभा निवडणुका जिंकून खासदार संजय धोत्रे यांनी अकोला मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व राखले. प्रकृती अस्वास्थामुळे सध्या ते सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला नवा उमेदवार रिंगणात उतरावा लागणार आहे. भाजपमध्ये उमेदवारीसाठी खासदार पूत्र अनुप धोत्रेंसह अर्धा डझन इच्छुकांची गर्दी आहे. उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, यावर अद्याप स्पष्टता नाही.

हेही वाचा – जिंकण्याची क्षमता असेल तरच जागा मागा, शहा यांनी शिंदे-पवारांना बजावले !

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुती व ‘मविआ’मध्ये काथ्थाकूट सुरू आहे. महायुतीमध्ये परंपरेप्रमाणे अकोल्यात भाजपच लढेल, यात दुमत नाही. भाजपचे ‘चाणक्य’ म्हणून ओळख असलेले अमित शहा यांनी नुकताच अकोला दौरा करून विदर्भातील सहा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीतील रणनीतीचा मंत्र दिला. पक्षात नव्याने येणाऱ्यांमुळे जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये असुरक्षिततेची व अन्यायाची भावना लक्षात घेऊन अमित शहांनी त्या मुद्द्याला स्पर्श केला. पक्षात नव्याने येणाऱ्यांमुळे पक्षातील जुन्यांचे कुठलेही नुकसान होणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. अंतर्गत विसंवाद व वादावादीचा निवडणुकीत फटका बसण्याचा धोका लक्षात घेऊन अमित शहा यांनी पक्षाला एकसंघ ठेवण्याचे प्रयत्न केले. महायुती व पक्षाने दिलेला उमेदवार आपण स्वत: असल्याचे समजून काम करण्याची सूचना त्यांनी दिली. अमित शहा यांनी उमेदवारी संदर्भात बैठकीत कुठलेही वक्तव्य केले नाही.

शिंदे गटाच्या मतदारासंघावरही भाजपचे लक्ष

भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी विदर्भातील सहा मतदारसंघांचा आढावा घेतला. यामध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार असलेल्या बुलढाणा आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघांतील तयारीचीसुद्धा त्यांनी माहिती घेतली. या मतदारसंघांवर देखील भाजपचे लक्ष असून पदाधिकाऱ्यांना ‘दक्ष’ राहण्याच्या सूचना आहेत.

हेही वाचा – मावळमध्ये महाविकास आघाडीचे ठरले, महायुतीत अद्यापही अनिश्चितता

भाजपचा दबदबा असलेल्या अकोला मतदारसंघातून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक बाशिंग बांधून तयार आहेत. तिकिटासाठी मोर्चेबांधणी करून त्यांच्या नागपूर, मुंबई व दिल्लीच्या वाऱ्या देखील सुरू आहेत. अद्याप वरिष्ठांकडून शब्द मिळालेला नाही. वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसंदर्भात पत्ते उघडले नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.