अकोला : वंचित बहुजन आघाडीचा ‘मविआ’तील समावेशावर सकारात्मक पाऊले उचलली जात आहेत. ‘मविआ’मध्ये त्यांचा सहभाग झाल्यास परंपरागत अकोला लोकसभा मतदारसंघावर वंचितचा प्रथम दावा राहणार असून काँग्रेसला ही जागा सोडावी लागेल. ‘मविआ’चा घटक पक्ष म्हणून वंचित निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास महायुतीपुढे मोठे आव्हान निर्माण होऊन तुल्यबळ लढतीचे संकेत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. ‘मविआ’ व ‘इंडिया’मध्ये वंचित आघाडीचा समावेश होणार का? या प्रश्नावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. वंचित आघाडीने काँग्रेसला वारंवार पत्र देऊन ती इच्छा व्यक्त केली. ‘मविआ’च्या सोमवारी झालेल्या बैठकीनंतर ‘वंचित’चा आघाडीत समावेश करण्यात आल्याचे तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी जाहीर केले. या बैठकीत मानापनाचे नाट्य देखील रंगले. २ फेब्रुवारीला ‘मविआ’च्या बैठकीत वंचित आघाडी सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. ‘मविआ’ आणि इंडियातील समावेशावर अ. भा. काँग्रेस समितीने निर्णय घ्यावा, असे सांगत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अद्याप समावेश झाला नसल्याचे स्पष्ट केले. वंचित सहभागी झाल्यावर ‘मविआ’मध्ये जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. आमच्यासाठी जागांच्या संख्येचा मुद्दा महत्त्वाचा नसल्याचे वंचितकडून सांगण्यात येत असले तरी अकोल्यासह प्रमुख चार ते पाच जागांवर त्यांचा डोळा राहील.

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला

हेही वाचा : फुटीनंतरही उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व कायम राहिलेल्या परभणीत भगवा पुन्हा फडकणार ? 

भाजपविरोधात धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून काँग्रेस व ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येण्याची चर्चा प्रत्येक लोकसभा निवडणुकीत होत असते. १९९८ आणि १९९९ च्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस व ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी केली होती. त्यावेळी अकोला मतदारसंघातून ॲड. प्रकाश आंबेडकर दोनवेळा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर २००४, २००९, २०१४ व २०१९ च्या सलग चार लोकसभा निवडणुका ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेस स्वबळावर लढल्याने त्याचा दोन्ही पक्षांना फटका बसला, तर भाजपला फायदा झाल्याचा इतिहास आहे.

हेही वाचा : झारखंडमध्ये राजकारण तापलं! ईडीची कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा हेमंत सोरेन यांचा आरोप; भाजपानेही दिले प्रत्युत्तर, म्हणाले…

आता दोन दशकानंतर पुन्हा ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली. गत पाच ते सहा महिन्यांपासून ‘मविआ’तील समावेशाचा मुद्दा रेंगाळल्याने वंचितने स्वबळावर तयारी सुरू केली. परंपरागत अकोला मतदारसंघातून ॲड. प्रकाश आंबेडकरांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर करून जोरदार मोर्चेबांधणी देखील केली. १९८४ पासून ॲड.आंबेडकर सातत्याने अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढत आहेत. आता २०२४ मध्ये सलग अकराव्यांदा ते येथून आपले नशीब आजमावतील. वंचितचा ‘मविआ’मध्ये समावेश झाल्यास सर्वप्रथम अकोला लोकसभेवर त्यांचा दावा राहील. अकोल्याची जागा आघाडीसाठी अडचणीची ठरणार नाही. आघाडी झाल्यास अडीच दशकानंतर पुन्हा अकोला लोकसभेच्या रिंगणात भाजप व वंचितमध्ये काट्याची लढत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : ‘भारत जोडो न्याय यात्रा’ राज्यात दाखल होण्यापूर्वी ममता बॅनर्जींची काँग्रेसवर टीका; पश्चिम बंगालमध्ये पुन्हा राजकारण तापणार?

“नरेंद्र मोदी पुन्हा केंद्रात सत्तेत येऊ नये म्हणून आम्ही ‘मविआ’ व इंडिया आघाडीत सहभागी होण्यास इच्छूक आहोत. अद्याप ‘मविआ’मध्ये सहभागी झालेलो नाही. अंतिम निर्णय काँग्रेसने घ्यावा.” – ॲड. प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित आघाडी.

Story img Loader