दिगंबर शिंदे
सांगली : महापालिका निवडणुका कधी होतील हे सध्या तरी कोणीच छातीठोकपणे सांगू शकत नसले तरी आगामी निवडणुकीमध्ये शतप्रतिशत भाजपच असे धोरण सध्या दिसत आहे. हे ओळखूनच महापालिकेत झालेल्या महासभेत राज्य शासनाचा नगरोत्थान निधी केवळ मिरज मतदार संघासाठीच का, असा सवाल करीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांना लक्ष्य करीत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केले. तर याला उत्तर म्हणून शहरातील बालोद्यांनाच्या नावावरून भाजपने आघाडीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
महापालिकेची मुदत संपण्यास आता केवळ सहा महिन्यांचा अवधी उरला आहे. निवडणुकीची रणधुमाळी मात्र निर्धारित वेळेत सुरू होईल याची खात्री ना भाजपला ना आघाडीला. कारण अद्याप प्रभाग रचनेसह अन्य निवडणुक पूर्व कार्यक्रमच जाहीर झालेला नाही. त्यात जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद, सात बाजार समितींच्या निवडणुका प्रलंबित आहेत. अशात महापालिका निवडणुका निर्धारित वेळेत होतील याची खात्री कोणालाच नाही. पावसाचा हंगाम संपल्यानंतर मात्र, लोकसभेपुर्वी महापालिका निवडणुका होतील असे गृहित धरूनच राजकीय कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सध्या सुरू आहे.
हेही वाचा… Maharashtra News Live: विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाकडे
निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतरच कार्यकर्त्यांची पळवापळवी, पक्षांतरासाठी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे अशा उड्या सुरू होतील. तोपर्यंत एकमेकांना शह काटशह देण्याचा प्रयत्न सभागृहातील आयुधांच्या माध्यमातून सुरू राहतील याची झलक शुक्रवारी झालेल्या महासभेत झालेल्या रणकंदनावरून पाहण्यास मिळाली.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून महापालिका क्षेत्रामध्ये मिरज व कुपवाडसाठी २९४ विकास कामांचा प्रस्ताव मान्यतेसाठी महासभेसमोर ठेवण्यात आला होता.या प्रस्तावावरून काही सदस्यांनी ही कामे केवळ मिरज मतदार संघातीलच आहेत असा आक्षेप घेत सांगलीतही विकास कामासाठी निधीची गरज असल्याचे सांगत पालकमंत्री खाडे हे मिरज मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने त्यांच्याच मतदार संघातील कामांना निधी आणि सांगलीवर अन्याय का असा सवाल केला. पालकमंत्र्यांनी अशी संकुचित वृत्ती ठेवू नये असा सल्लाही दिला गेला. तर काँग्रेसच्या एका महिला सदस्यांनी प्रस्तावित कामाची तपासणी करण्याची मागणी करीत मंत्री खाडे यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हेही वाचा… विमान, रेल्वे आणि समृद्धीच्या मार्गे शिर्डीत भाजपची बांधणी
आघाडीच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडे मुद्दा नसल्याने बालोद्यानला नाव देण्यावरून राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपच्या एका महिला सदस्यांनी केला. नेमिनाथनगरमधील बालोद्यानला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव दिला होता, त्याचे काय झाले अशी विचारणा भाजपकडून होताच राष्ट्रवादीने या उद्यानाला सिंधूताई सपकाळ यांचे नाव देण्याचा आग्रह धरण्यात आला. यावर भाजपच्या नेत्या आणि सभागृह नेत्या भारती दिगडे यांनी पुढील वेळी पूर्ण बहुमताने भाजपची सत्ता असेल त्यावेळी आम्हीच बगिच्यांना नावे देउ असे सांगत शतप्रतिशत भाजप हेच आगामी धोरण असेल असे अप्रत्यक्ष सुचविले. राज्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपची सत्ता असली तरी महापालिका क्षेत्रामध्ये शिवसेनेचे अस्तित्व अदखलपात्रच सध्या तरी आहे. त्यामुळे भाजपच्या शतप्रतिशत दाव्याला मित्रांची फारशी आडकाठी असण्याचा प्रश्नच उरलेला नाही.