अलिबाग : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी पक्षासह विरोधकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी महिला संवाद मेळाव्यांच्या आडून साडी वाटपाचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

महिला मतदारांची मने जिंकण्यासाठी राज्यसरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या अंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. या योजनेला मिळणारा महिलांचा प्रतिसाद लक्षणीय आहे. त्यामुळे विरोधकांकडूनही आता महिला मतांसाठी राजकीय मोर्चेबांधणीला सुरूवात झाली असल्याचे चित्र सध्या रायगड जिल्ह्यात पहायला मिळत आहे.

maharashtra government defends ladki bahin yojana in bombay high court
महिला सशक्तीकरणासाठी ‘लाडकी बहीण’; राज्य शासनाचे उच्च न्यायालयात उत्तर; अतिरिक्त भार पडत नसल्याचे स्पष्टीकरण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
PM Modi to dedicate 3 frontline naval combatants to nation
आत्मनिर्भरतेतील आव्हाने!
Article about obcs dominate government job recruitment
लोकजागर : ओबीसींची ‘सर्वोच्च’ अडवणूक!
Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य
Nagpur female missing
उपराजधानीतून वर्षभरात ५५९ मुली-महिला बेपत्ता, बेपत्तांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
Female officer of provident fund office assaulted Shivajinagar police files case against businessman
भविष्य निर्वाह कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवाजीनगर पोलिसांकडून व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

आणखी वाचा-Haryana Exit Poll: सत्ता टप्प्यात दिसताच काँग्रेससमोर मुख्यमंत्री पदाचा पेच; पद एक, दावेदार अनेक

शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील या अलिबाग विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. पक्षाने उमेदवारी जाहीर केली नसली तरी त्यांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे. विभागवार महिला संवाद मेळावे घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. यासाठी महिला बचत गट फेडरेशनचा वापर केला जात आहे. फेडरेशनच्या माध्यमातून महिला बचत गटांना एकत्र आणून महिलांची मते शेकापकडे वळावीत यासाठी प्रयत्न केले जात आहे. महिला संवाद मेळाव्याच्या आडून साडी वाटपाचे कार्यक्रमही घेतले जात आहेत.

शेकापच्या या महिला संवाद मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन, शिवसेना शिंदे गटाकडूनही अलिबाग मतदारसंघात महिला संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. कुर्डूस आणि शहापूर विभागातील महिलांसाठी संवाद मेळावा घेतला. यावेळी आठ हजार महिलांना साडी वाटप करण्यात आले. महिला मतदारांच्या मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

आणखी वाचा-Exit Polls: एग्झिट पोल खरे ठरतात का? हरियाणा व जम्मू-काश्मीरमध्ये काय आहे अनुभव? वाचा २०१४-१९ ची स्थिती!

काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अँड. प्रविण ठाकूर यांनी नवरात्रीचे औचित्यसाधून नऊ दिवस पैठणी नवरंग पैठणी उत्सव सुरू केला आहे. दररोज एका सोडत काढून एका महिलेला पैठणीचे वाटप केले जाणार आहे.

महिला मतदारांची लक्षणीय सख्या लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महिला मतांना आपल्या पक्षाकडे वळविण्यासाठी निरनिराळ्या क्लुप्त्या लढविण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात एकूण २४ लाख ४६ हजार १५३ मतदार आहेत. ज्यात १२ लाख ४० हजार ५६२ पुरूष तर १२ लाख ०५ हजार ५०० महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची ही लक्षणीय संख्या लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी महिला मतदारांच्या मतांच्या बेगमीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Story img Loader