Today in Politics :  तमिळनाडू सरकारने बुधवारी नीट (NEET) च्या मुद्द्यावर राज्यातील सर्व विधिमंडळ पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. मात्र एआयएडीएमके पक्षाचे अध्यक्ष एडप्पादी के पलानीस्वामी यांनी मंगळवारी ते या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. परीक्षा रद्द करून न शकल्याने त्यांनी ही बैठक म्हणजे एक नाटक असून यामुळे काहीही साध्य होणार नाही असा दावा केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी ४ एप्रिल रोजी राज्याला नीटमधून सूट मिळावी यासाठी राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आलेला ठराव नाकारण्यात आल्याचे माहिती दिली होती.

दरम्यान पक्षाच्या निवेदनात पलानीस्वामी यांनी यांनी स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र आणि उपमुख्यमंत्री उदयनिधी यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नीट रद्द करण्याबाबत खोटी आश्वासने दिल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी दावा केला होता की त्यांना नीट रद्द करण्यासाठीचे रहस्य माहिती असून डीएमकेचे सरकार आल्यानंतर पहिली स्वाक्षरी ही या संदर्भातील असेल असा दावा त्यांनी केला होता.

काँग्रेसच्या संम्मेलनात दोन ठरावांवर चर्चा

देशातील राजकीय परिस्थिती आणि गुजरातमधील राजकारण या दोन मुद्द्यांवर गुरूवारी अहमदाबाद येथील सरदार पटेल राष्ट्रीय स्मारकामध्ये होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा केली जाणार आहे.

काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी माध्यमांनी माहिती देताना सांगितले की, पटेल यांच्या १५०व्या जयंती निमित्त त्यांच्याबद्दल एक विशेष ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी भाजपा आणि आरएसएसकडून खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप केला. तसेच नेहरू आणि पटेल यांच्यात एक विशेष नाते होते आणि ‘जुगलबंदी’ होती, असेही रमेश यावेळी म्हणाले.

कार्यकारिणी समितीच्या बैठकीत गुजरात आणि राष्ट्रीय मुद्द्यासंबंधी ठराव सादर करण्यात आले आणि बुधवारी होणार्‍या एआयसीसीच्या अधिवेशनात ते मंजूर केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

विस्तारित कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये मांडलेल्या ठरावात पक्षाने म्हटले आहे की, खोटा संघर्ष आणि खोडसाळपणे सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांच्यातील संघर्षांबद्दल जाणून बुजून खोट्या गोष्टी पसरवण्यात आल्या.

“खरे तर, हा हल्ला आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या नीतिमत्तेवर आणि गांधी-नेहरू-पटेल यांच्या नेतृत्वावर हल्ला होता,” असेही ठरावत म्हटले आहे.

“फसवणूक आणि जे खरे नाही ते खरे भासवणारे जाळे टिकू शकले नाही, सरदार पटेल यांनी स्वतः पंडित नेहरू यांना ३ ऑगस्ट १९४७ रोजी पत्र लिहिले आणि स्पष्टपणे म्हणाले की, ‘आमची एकमेकांबद्दलची ओढ आणि प्रेम आणि जवळजवळ ३० वर्षांच्या आमची अखंड सोबत कोणत्याही औपचारिकतेशिवाय आहे… आमचे जोडले जाणे अतूट आहे आणि त्यातच आमची ताकद आहे’,” असे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीच्या ठरावात म्हटले आहे.

अहमदाबादमधील अधिवेशनाला काँग्रेसने ‘न्यायपथ’ म्हटले असून हाच मार्ग सरदार पटेलांनी दाखवला आहे. याच मार्गाने संविधान व लोकशाहीचे रक्षण केले जाऊ शकते आणि त्याच मार्गावरून चालण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचा दावाही ठरावात केला आहे. हा ठराव बुधवारी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीमध्ये संमत केला जाईल.

निर्मला सीतारमण लंडनमध्ये

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बुधवारी लंडनमध्ये भारत-यूके इकॉनॉमीक अँड फायनांशियल डॉयलॉग सहभागी होतील. या १३ व्या ईएफडी संवादामध्ये केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आणि यूकेचे चान्सलर ऑफ द एक्सचेकर हे देखील सहभागी होणार आहेत.

हे १३वे ईएफडी हे दोन्ही देशांना गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचे द्विपक्षीय व्यासपीठ आहे. यामुळे मंत्र्यांच्या पातळीवर, तसेच अधिकारी, वर्किंग ग्रुप्स आणि कार्यकारी गट तसेच संबंधित नियामक संस्थांमध्ये आर्थिक सहकाराच्या संधी निर्माण केल्या जातात. तसेच याद्वारे गुंतवणूक, आर्थिक सुविधा, आर्थिक नियमन, यूपीआय लिंकेज, कर आकारणी आणि बेकायदेशीर आर्थिक प्रवाह यांच्याबाबत देखील सहकार्य केले जाते.

भारत-यूके १३ व्या ईएफडी यांच्याबरोबरच सीतारमण प्रमुख नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका घेतील. याबरोबरच गुंतवणूकदार आणि प्रमुख वित्तीय संस्था तसेच कंपन्यांच्या प्रमुखांबरोबर देखील त्या बैठका घेतील.

पियुष गोयल घेणार निर्यातदारांबरोबर बैठक

ट्रम्प प्रशासनाने २६ टक्के व्यापार कर लावल्याने केंद्रीय कॉमर्स आणि इंडस्ट्री मंत्री पियुष गोयल हे बुधवारी निर्यातदारांबरोबर बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत गोयल हे भारतीय व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेतील, अशी माहिती एका उद्योग क्षेत्रातील अधिकार्‍याने रविवारी दिली. उद्योग अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वाणिज्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि एक्सपोर्ट प्रमशन काउंन्सील (EPCs) आणि इंडियन इक्सपोर्ट ऑर्गनायजेशन (FIEO) चे प्रतिनिधी देखील या बैठकीत उपस्थित असतील.