चंद्रशेखर बोबडे

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनात जुने कार्यकर्ते शरद पवारांसोबत तर नंतरच्या काळात पक्षात आलेले अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. यामुळे नागपुरात मुळातच कमकुवत असलेला हा पक्ष आता विभाजनामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आणखी खिळखिळा होण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
dcm devendra fadnavis praise obc community
भाजपच ओबीसींच्या पाठीशी!, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
The ploy of power by creating conflicts between castes Prime Minister Narendra Modi accuses Congress Print politics news
जातीजातीत भांडणे लावून सत्तेचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग नागपूरमध्ये विविध क्षेत्रात असला तरी पक्षाला नागपुरात स्वत:ची मोठी ताकद निर्माण करता आली नाही. सुरूवातीच्या काळात दत्ता मेघे यांच्याकडे पक्षाची सूत्रे असताना नागपुरात पक्षाच्या नगरसेवकांची संख्या दोन आकडी होती. महापालिकेत पक्षाचा उपमहापौर होता. पण मेघे पक्ष सोडून गेल्यानंतर महापालिकेत या पक्षाच्या नगरसेवकांची संख्या एकवर आली. शहरात विधानसभेचे सहा मतदारसंघ असले तरी एकाही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवावी इतकी शक्ती व उमेदवार या पक्षाकडे नाही.

हेही वाचा… कोल्हापुरात भाजप- शिवसेनेत आधीच धुसफूस त्यात आता राष्ट्रवादीची भर

मागील काही वर्षात पक्ष विस्ताराच्या प्रयत्नात अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्या माध्यमातून इतर पक्षातून काही नेते राष्ट्रवादीत आले. पण पक्षाची ताकद वाढली नाही. सध्या मोजकेच कार्यकर्ते व नेत्यांच्या जोरावर नागपुरात पक्ष सक्रिय आहे. आता फुट पडल्यावर त्याही कार्यकर्त्यांमध्ये विभाजन झालेले दिसून येते. जुने, कार्यकर्ते व काही नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत आहेत. पक्षाचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीनेही शरद पवार यांच्याच नेतृत्वात काम करण्याचा ठराव घेतला. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य, पक्षाचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील, शेखर सावरबांधे, रमण ठवकर, वर्षा शामकुळे आदी पदाधिकाऱ्यांनीही शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे ईश्वर बाळबुधे, प्रशांत पवार आणि आभा पांडे आदींनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. यासोबतच काही जुने व अलीकडेच पक्षात आलेल्या काही नेत्यांनी बुधवारी मुंबईत दोन्ही गटाच्या मेळाव्यांना हजेरी लावून तेथे प्रतीक्षापत्रही भरून दिल्याची माहिती आहे. काहीजण अजूनही कुंपणावरच आहे. नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच एकमेव आमदार अनिल देशमुख यांनी खंबीरपणे शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने संख्येने कमी असलेल्या पण शरद पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा… सत्तेतील ‘दादा’प्रवेशाने ठाण्यात भाजप खुशीत

अनिल देशमुख यांना संधी

राष्ट्रवादीचे विदर्भात सहा आमदार आहेत. त्यापैकी देशमुख (काटोल) व राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा) वगळता चार आमदार अजित पवार यांच्या गटात गेले आहेत. त्यामुळे पूर्व विदर्भात अनिल देशमुख आणि पश्चिम विदर्भात राजेंद्र शिंगणे यांना नव्याने पक्ष उभारण्याची व नेतृत्व करण्याची संधी आहे.

“अनिल देशमुख यांनी खंबीरपणे शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते नागपूर शहरातही नव्याने पक्षबांधणी करतील.” – वेदप्रकाश आर्य, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी