लातूर : निवडणूक लोकसभेची असो की विधानसभेची, लातुरातील देशमुख कुटुंबीय मन लावून प्रचारात उतरतात. यावेळची लोकसभेची निवडणूक देशमुख कुटुंबीयांनी अगदी मनावर घेतली आहे. लातूर शहरचे आमदार अमित देशमुख व ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख हे दोघेजण आपापल्या मतदारसंघांमध्ये निवडणुकीत गुंतलेले आहेत. अमित देशमुख हे स्टार प्रचारक असल्याने लातूरबरोबरच नांदेड, सोलापूर, पंढरपूर, धाराशिव व संभाजीनगर या ठिकाणी ते आत्तापर्यंत निवडणूक प्रचारात जाऊन आले. ते लातूर लोकसभा निवडणूक प्रमुख असल्याने लातूरच्या जिल्हाअंतर्गत विधानसभा मतदारसंघातही सतत संपर्कात आहेत. लातूर शहरात कोपरा सभा घेण्यापासून एखाद्याच्या दुकानातही जाऊन ते पंधरा-वीस जणांच्या बैठकीत बोलत आहेत. लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो आहे. त्यामुळेच या निवडणुकीत अंग झटकून ते कामाला लागल्याची चर्चा मतदारसंघात होते आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा