छत्रपती संभाजीनगर : विलासराव देशमुख यांच्यासारखं हुबेहुब दिसणं. बोलताना दोन शब्दांमधील मौनाचं अंतरही तेवढेच. पण तसे निरर्थक. विलासरावांसारखा राजकीय भाष्य न करणारे. पण संस्थात्मक पकड अधिक मजबूत. लातूरचे देशमुख कुटुंबियांचे सध्या ११ साखर कारखाने चालवतात. त्याचे राजकीय नेतृत्व अमित देशमुख यांच्या हाती. त्यामुळे विरोधकांवर फारशी टीका न करता आपला कार्यभाग साधून घेण्याची कार्यशैली. त्यामुळे साखरेच्या संघटनात्मक गोडव्याला भाजपच्या अर्चना पाटील आव्हान देऊ शकतील का, हा प्रश्न सध्या लातूरमध्ये चर्चेत आहे.

आपला साखर धंदा २१ कारखान्यांपर्यंत विस्तारला जावा असा संकल्प ट्वेंटीवन शुगरच्या माध्यामातून करणाऱ्या अमित देशमुख यांचा राजकीय प्रभाव तसा कमीच. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वैद्यकीय शिक्षणमंत्री पद सांभाळणाऱ्या अमित देशमुखांपेक्षा राजेश टोपे कामात करोना काळात सरस ठरलेले. याच काळात त्यांनी अनेक कारखाने चालवायला घेतले. पण अनेकदा यात त्यांना अपयश आले. नळेगावच्या कारखाना चालविण्यास घेतल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. अगदी मंडप टाकून बॅन्डबाजाही लावण्यात आला. पण राज्य शिखर बँकेने तोपर्यंत हा कारखाना चालविण्यासाठी आवश्यक असणारी परवानगीच दिली नव्हती. तेरणा साखर कारखाना चालविण्यासाठी निविदा पातळीवर उच्च न्यायालयापर्यंत वाद नेण्यात आला. पण येथे शिवसेनेने त्यांच्यावर मात केली. त्याचा किस्सा मंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर कौतुक करण्यासाठी सांगितला आणि साखर कारखांनदारीतील व्यवहार कसे ठरतात हे जाहीर झाले. सावंत म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांनी फोन केला. तेरणा तानाजी सावंत यांना चालवायचा आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणातून माघार घ्या. दुपारी मांजरा परिवाराने अंग काढून घेतले.’

Sugar factory workers warn of strike Government announces committee for wage hike Mumbai news
साखर कारखाना कामगारांचा संपाचा इशारा; वेतनवाढीसाठी सरकारकडून समितीची घोषणा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
Agriculture Department prepared for Rabi season in district preparing agriculture in Konkan region for second time after paddy harvest
जिल्ह्यात ५ हजार ६८२ हेक्टरवर रब्बीचे नियोजन, २ हजार ९४० हेक्टरवर कडधान्यांची लागवड
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?
Mahesh Kharade warns of agitation as Rajarambapu Sugar Factorys Rs 3200 installment is invalid
राजारामबापू’च्या ऊसदरास शेतकरी संघटनांचा विरोध, ‘स्वाभिमानी’चा आंदोलनाचा इशारा

आणखी वाचा-विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे ‘भारत जोडो’ अभियानाला साकडे

दोन कारखान्यांमध्ये यश मिळाले नसले तरी अमित देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय ११ कारखाने चालवतात. ‘मांजरा परिवार’ असे त्याला म्हटले जाते. १९८४ मध्ये राजीव गांधी यांच्या उपस्थितीमध्ये पहिला साखर कारखाना सुरू करण्यात आला. तेव्हा मांजरा परिसराचे राजीवनगर होते आता ते विलासनगर असे झाले आहे. कारखान्याचे नावही विलासराव देशमुख सहकारी साखर कारखाना करण्यात आले आहे. संस्थात्मक पकड वाढली आहे. या कारखान्यांमध्ये सहवीज निमिर्तीचे प्रकल्प आहेत. असावानी प्रकल्पही सुरू आहेत. काही कारखान्याच्या अध्यक्ष वैशालीताई देशमुख आहेत. काही कारखान्याचे नियोजन अमित देशमुख यांचे काका दिलीपराव देशमुख हे लावतात. एखादा कारखाना आजारी पडला आणि त्यांची विक्री होणार आहे, असे म्हटले की लातूरचा चमू तो कारखाना चालविण्यास ट्वेंटी वन शुगरचा पुढाकार असतो, असे चित्र मराठवाड्यात आहे.

अलिकडेच मारुती महाराज कारखाना चालविण्यास घेण्यात आला. देवणी येथील जागृती साखर कारखाना, उदगीरमधील प्रियदर्शनी, तुळजापूरमधील कंचेश्वर, लोहा तालुक्यातील धाराशिव साखर कारखाना, केजमधील विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना, याशिवाय ट्वेंटीवन शुगरची क्षमता सर्वाधिक आहे. त्यामुळेच मराठवाड्यातील साखर धंद्यातील सारे गणित बऱ्याचदा लातूरहून ठरते. या सर्व कारखान्यांना लातूर जिल्हा बँकेकडून सहकार्य होत असते. या बँकेचे अध्यक्ष आहेत लातूरचे ग्रामीण आमदार धीरज देशमुख. या संस्थात्मक रचनेत कोणत्या ना कोणत्या स्वरुपात जोडलेला मतदार ही देशमुख कुटुबियांची ताकद. उसतोडणीपासून ते साखर कारखान्याला लागणारे विविध साहित्य पुरविणारे कंत्राटदार, एका कारखान्याला जोडलेले किमान १५ हजार शेतकरी सभासद. त्यांचे विविध तालुक्यात पसरलेले नातेवाईक असा मतदारांचा मोठा पसारा. त्याला आव्हान देण्याचे काम भाजपच्या नेत्यांना अद्यापपर्यंत करता आलेले नाही. आता ही जबाबदारी अर्चना पाटील चाकुरकर यांनी घ्यावी, अशी रचना लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती.

आणखी वाचा-चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांच्या विरोधात कोण लढणार ?

एका बाजूला साखर कारखान्यावरील मजबूत पकड असणारे अमित देशमुख तसे लोकांमध्ये फार मिसळत नाहीत. त्यामुळेच लोकसभा निवडणूक प्रचारात एकदा छोट्या हॉटेलमध्ये त्यांनी पुरीभाजी खाल्याचे कोण कौतुक झाले. अशोकराव चव्हाण यांचे भाजपमध्ये जाण्याचे अमित देशमुख राजकारणातही अचानक ‘वरिष्ठ’ झाले आहेत. त्यामुळे त्यांचा निवडणुकीत पराभव करण्यासाठी भाजपने ‘लिंगायत मतेपढीला आकार देण्याचे ठरविले आहे. मात्र, डॉ. शिवाजी काळगे यांना आपल्याकडे ओढून अमित देशमुख यांनी कुरघोडी केली. या सर्वांवर मात करणारी व्यक्ती म्हणून अर्चना चाकुरकर यांच्याकडे पाहिले जात आहे. शिवराज पाटील चाकुरकर यांच्यामुळे बांधली गेलेली लिंगायत मतपेढी भाजप तारुन नेईल. असा भाजप नेत्यांचा होरा आहे.

Story img Loader