लातूर : ‘महाराष्ट्रात २८८ फ्लॅट २३७ ‘महायुती’नेच पळवले. आम्हाला फ्लॅट मिळेल नाही याची चिंता होती. पण कशीबशी पावती फाडत एक फ्लॅट मिळाला.’ असे म्हणत आमदार अमित देशमुख यांनी स्वत:च्या राजकीय प्रवासावर कोटी केली. भाषणात त्यांच्या या वक्तव्याला दाद मिळाली पण त्यांनी केलेली कोटी त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर विनोद असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे मराठवाड्याचे नते म्हणून अमित देशमुख आपला मतदारसंघ तर राखतीलच पण त्यांचे बंधू धीरज यांनाही निवडून आणतील तसेच मराठवाड्यातील काँग्रेसच्या नेत्यांना पाठबळ देतील असे मानले जात होते. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसचे सारे नेते अमित देशमुख यांच्याकडेच नेता म्हणून पाहू लागले होते. त्यांनीही मराठवाडाभर प्रचार करायला सुरुवात केली होती. मात्र, इतरांसाठीची बांधणी करताना लातूर शहरात भाजपने अर्चना पाटील यांना उमेदवारी देऊन राजकीय मैदानात अमित देशमुख यांना पराभूत करण्याची रणनीती आखली होती. सारी ताकद लावल्याने विधानसभा निवडणुकीत केवळ सात हजार मताने अमित देशमुख लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. मात्र, त्यांचे बंधू धीरज यांनाही पराभवाच्या सामना करावा लागला. काँग्रेसची पडझड मोठ्या प्रमाणात झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.

आणखी वाचा-डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपद पणाला लावून भारताला जागतिक नकाशावर कसं आणलं?

झाले असे की ,लातूर क्रीडाईच्यावतीने प्रॉपर्टी एक्सपोच्या कार्यक्रमात आमदार अमित देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून ते आमदार संभाजी पाटील निलंगेकरांना उद्देशून म्हणाले, ‘उदगीरचे आमदार संजय बनसोडे हे ९३ हजारापेक्षाअधिक मताधिक्याने विजयी झाले. आपण मात्र काठावरच निवडून आलो. निवडणूक संपल्यानंतर आता विकासासाठी एकत्र आले पाहिजे.’ अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकरांना एकमेकांना पराभूत करण्यासाठी खासे प्रयत्न केले होते. असा या वक्तव्याचा राजकीय संदर्भ होता. आता लातूरच्या विकासासाठी एकत्र येऊ असा सूरही ही या कार्यक्रमात उमटला. लातूर हे सुसंस्कृत आहे. ती परंपरा आपण जपू. लातूरचे बीड होणार नाही तर बीडचे ही लातूर करु असेही ते म्हणाले.