कर्नाटक राज्यात या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपाने ही निवडणूक जिंकून कर्नाटकमधील आपली सत्ता कायम राखण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. याच कारणामुळे मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह कर्नाटकचा सातत्याने दौरा करत आहेत. दरम्यान, कर्नाटकमध्ये असताना अमित शाह यांनी ‘काँग्रेस’ आणि ‘जेडीएस’ला घेरलं आहे. टिपू सुलतान यांचा संदर्भ देत अमित शाहा यांनी काँग्रेसवर टीका केली असून तुम्ही कोणाच्या पाठीमागे उभे राहणार? असा भावनिक सवाल मतदारांना केला आहे.
हेही वाचा >>> “…तर त्यांना ठोकणार,” पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपतींचे विधान, म्हणाले…
अमित शाह काय म्हणाले?
अमित शाह यांनी कर्नाटकमधील एका सहकारी संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी भाषण केले. यावेळी “जे लोक १८ व्या शतकातील म्हैसुरचे शासक टिपू सलतान यांच्यावर विश्वास ठेवतात ते कर्नाटकसाठी काहीही चांगले करू शकत नाहीत. आम्ही १६व्या शतकातील राणी तुलुवा यांच्यावर विश्वास ठेवतो,” असे अमित शाह म्हणाले. तसेच काँग्रेस टिपू सुलतान यांच्यावर विश्वास ठेवतो. माग लोकांनी त्यांना मतदान करावे की राणी अबाक्का यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या भाजपाला मतदान करावे? असा सवालही अमित शाह यांनी केला.
हेही वाचा >>> जित पवार म्हणाले ‘त्यांनी दारुची दुकानं उघडली,’ आता संदिपान भुमरेंचे जशास तसे उत्तर; म्हणाले ” ते आम्हाला…”
मोदी यांनीही केला होता राणी अबाक्का यांचा उल्लेख
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमध्ये एका सभेला संबोधित करताना राणी अबाक्का यांचा उल्लेख केला होता. राणी अबाक्का यांच्यासह त्यांनी राणी चेन्नाभैरा यांचाही उल्लेख केला होता. या दोन्ही कर्नाटकमधील स्थानिक महिला होत्या. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले होते.
हेही वाचा >>> कोश्यारींचा राजीनामा मंजूर होताच संभाजीराजेंचा नव्या राज्यपालांना मोलाचा सल्ला, म्हणाले “ज्या चुका…”
राणी अबाक्का कोण आहेत?
इंदिरा गांधी नॅशनल सेंटर ऑफ आर्ट्सच्या संकेतस्थळावर अबाक्का यांच्याविषयी माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार अबाक्का यांना कर्नाटकध्ये राणी अबाक्का म्हटले जाते. त्यांना स्थानिक पातळीवर अबाक्का महादेवी असेही म्हटले जाते. त्यांनी पोर्तुगीजांचा प्रतिकार केला, असे म्हटले जाते. आद्य स्वातंत्र्य सैनिकांपैकी त्या एक असल्याचे म्हटले जाते. तुलू नाडूवर त्यांनी राज्य केले होते. त्या छोटवा राजघरण्याच्या वंशज होत्या.