केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी तमिळनाडूचे भाजपा प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांच्या ‘माझा प्रदेश, माझे लोक’ या पदयात्रेला झेंडा दाखवून त्याचे उदघाटन केले. ही राजकीय तीर्थयात्रा असून तमिळ संस्कृती जगभरात पोहोचवणे, द्रमुक (DMK) सरकारचा भ्रष्टाचार उघड करणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी घेतलेले निर्णय लोकांपर्यंत नेण्याचे काम करेल, असे अमित शाह यांनी सांगितले. तमिळनाडूमध्ये एवढा मोठा कार्यक्रम होत असताना एनडीएचे घटकपक्ष असलेले पट्टाली मक्कल काची (PMK) आणि देसिया मुरपोक्कू द्रविड कडगम (DMDK) हे पक्ष मात्र गैरहजर होते. तर अण्णाद्रमुक (AIADMK) पक्षाशी अन्नामलाई यांचा वाद सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केवळ एका माजी मंत्र्याला कार्यक्रमाला धाडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले, “माझा प्रदेश, माझे लोक ही केवळ एक राजकीय पदयात्रा नाही. तमिळ वारसा जगभरात नेण्यासाठी हे एक पाऊल आहे. घराणेशाहीचे राजकारण नेस्तनाबूत करणे, तमिळनाडूला भ्रष्टाचारापासून मुक्त करणे आणि राज्यात कायदा व सुव्यवस्थेची पुर्नस्थापना करण्याचे ध्येय ही पदयात्रा साध्य करेल.”

के. अन्नामलाई यांची यात्रा राज्यातील २३४ विधानसभा मतदारसंघातून ७०० किमींचा पायी प्रवास करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश तळागाळात पोहोचवणे आणि तमिळ संस्कृतीला आणखी मजबूत करण्याचा या पदयात्रेचा उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तमिळ भाषेला कशाप्रकारे पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत, याचीही आठवण शाह यांनी करून दिली. संयुक्त राष्ट्रांच्या जनरल कौन्सिलमध्ये तमिळ भाषेचा केलेला उल्लेख आणि पापुआ न्यू गिनीच्या स्थानेक भाषेत तमिळ ‘तिरुक्कुरल’ (तमिळ साहित्यामधील काव्य) केलेला अनुवाद याची पुन्हा एकदा शाह यांनी उजळणी करून दिली.

हे वाचा >> ‘माजी आयपीएस, भाजपा नेते के. अन्नामलाई अनियंत्रित व्यक्ती की गुप्त शस्त्र’, भाजपाची नेमकी गोची कुठे झाली?

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि एनडीएतील सर्व घटक पक्ष मिळून दिल्लीत सत्ता स्थापन करतील, असे सांगत असतानाच अमित शाह यांनी काँग्रेस आणि द्रमुक पक्षांच्या सरकारमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारावर टीका केली. यावेळी शाह यांनी उपस्थित श्रोत्यांना प्रश्न विचारला. तमिळ लोकांना काय वाटते? काश्मीर या देशाचा आहे की नाही? हा प्रश्न त्यांनी दोनदा विचारून उपस्थित श्रोत्यांना मोठ्याने उत्तर देण्यास सांगितले. या माध्यमातून तमिळ लोकांमध्ये राष्ट्रीय भावना उत्तेजित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर आणि सर्जिकल स्ट्राईकबाबत चांगले निर्णय घेतले, पण विरोधकांनी यावर टीका केली असल्याची आठवण त्यांनी करून दिली.

“तुम्हाला दहशतवादापासून मुक्ती हवी आहे ना? जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईक केला, तेव्हा युपीएमधील काही राजकीय पक्षांनी यावर टीका केली. त्याचेवळी युपीएमधील काही पक्ष तमिळ लोकांच्या मारेकऱ्यांचा श्रीलंकेत जाऊन सत्कार करत होते. भारतातील संपुर्ण विरोधकांची गट हा फक्त त्यांच्या कुटुंबाच्या भल्यासाठी काम करत असून त्यांना देशाची काहीही पडलेली नाही”, अशा शब्दांमध्ये अमित शाह यांनी टीका केली.

“विरोधक जेव्हा जेव्हा लोकांसमोर मत मागायला जातील, तेव्हा तेव्हा लोकांना त्यांचा भ्रष्टाचारच आठवतो”, हे सांगत असताना अमित शाह यांनी राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा, २जी घोटाळा, पाणबुडी आणि हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा अशा घोटाळ्यांची मालिकांची आठवण करून दिली. विरोधकांवर टीका करत असतानाच शाह यांनी अन्नामलाई यांच्या पदयात्रेचे महत्त्वही विशद केले. तमिळनाडूच्या भविष्यासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा >> भाजपा प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांची जयललितांवर टीका; मित्रपक्ष अण्णाद्रमुक नाराज, आघाडीत बिघाडीची शक्यता

अन्नामलाई यांच्याशी शाब्दिक वाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर अण्णाद्रमुकचे सरचिटणीस यांनी ई. के. पलानीस्वामी यांनी स्वतःहून या कार्यक्रमाला जाणे टाळले. त्यांच्याजागी त्यांनी माजी मंत्री आर. बी. उदयकुमार यांना आपले प्रतिनिधी म्हणून पाठविले. याच पद्धतीने भाजपाचे दोन मित्र पक्ष पीएमके पक्षाचे अध्यक्ष अनबुमानी रामादोस आणि डीएमडीकेचे नेते प्रेमलता विजयाकांत यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले.

दरम्यान अण्णाद्रमुक पक्षातील अंतर्गत वाद भाजपा हाताळत आहे. अण्णाद्रमुक पक्षाचा अधिकृत गट म्हणून पलानीस्वामी यांना भाजपाने पाठिंबा दिला आहे. अण्णाद्रमुक पक्षाचे माजी नेते आणि एएमएमके पक्षाचे नेते टीटीव्ही दिनकरण म्हणाले की, ते एनडीएचा घटकपक्ष नाहीत. एनडीएमधील घटक पक्षात असलेल्या दरीकडे त्यांनी बोट दाखविले. २०१७ मध्ये जयललिता यांच्या निधनानंतर दिनकरण आणि त्यांच्या मावशी व्ही. के. शशीकला यांना पक्षाने शत्रू ठरविले. त्यामुळे दिनकरण यांना युतीमध्ये घ्यायचे की नाही? याबाबत भाजपाचा संभ्रम दिनकरण यांच्या विधानामुळे समोर आला. दुसरीकडे अण्णाद्रमुक पक्षाचे आणखी एक बंडखोर नेते ओ. पनीरसेल्व्हम यांच्याशी दिनकरण यांनी गाठ बांधली असून दोघेही २०२४ च्या आधी एनडीएचा घटकपक्ष म्हणून पुढे येऊ शकतात, असे सांगितले जाते.