मुंबई : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने वातावरणनिर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यातील दौरे वाढले आहेत.
लोकसभा निवडणुकीत राज्यात फटका बसल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मंगळवारपासून दोन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. महायुतीतील जागावाटपावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त निवडणुकीच्या मैदानात उतरणार? कोण आहेत संजय पांडे?
मंगळवारी शहा हे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. उद्या रात्री उशिरा संभाजीनगरमध्ये पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी शहा हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. बुधवारी नाशिक आणि कोल्हापूरमध्ये अमित शहा हे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. चारही ठिकाणी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, जिल्ह्यातील नेते, बूथ पातळीवरील पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. चारही ठिकाणी सुमारे दोन हजार पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यात महायुतीतील जागावाटपाच्या संदर्भात पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि विश्वासाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
हेही वाचा >>>प्रकल्पस्तांच्या मतांसाठी महायुतीची अखेरची धडपड, गरजेपोटी बांधकामे नियमित करण्याचा अखेर निर्णय
पुण्यात पायाभूत सुविधांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी पुण्यात येणार आहेत. शिवाजीनगर ते स्वारगेट भूमिगत मार्गाचे लोकार्पण, स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रोचे भूमिपूजन आणि सोलापूर विमानतळाचे उद्घाटन असे कार्यक्रम मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहेत.