Amit Shah slams Sharad Pawar Uddhav Thackeray BJP Shirdi Convention : भारतीय जनता पार्टीच्या राज्यस्तरीय अधिवेशनात (शिर्डी) केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. या अधिवेशनात बोलताना शाह यांनी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख तथा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी शाह यांनी उद्धव ठाकरे यांचा गद्दार व बेईमान असा उल्लेख केला. तर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हेच खरे पक्ष असल्याचा पुनरुच्चार केला. अलीकडेच उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. तसेच, शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (भाजपाची मातृशाखा) कौतुक केले होते. त्यामुळे आता शरद पवार व उद्धव ठाकरे यांची भाजपाशी जवळीक वाढत आहे का? अशा स्वरूपाची चर्चा धीम्या आवाजात चालू असतानाच अमित शाह यांनी या दोन्ही पक्षांबद्दल व त्यांच्या प्रमुख नेत्यांबद्दलचा त्यांच्या मनातील संताप व्यक्त केला.

अमित शाह यांच्या ठाकरे व पवारांबाबतच्या भूमिकेबद्दल भाजपाच्या सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी २०१९ साली जो विश्वासघात केला होता त्याबद्दल अजूनही खूप दुखावलेले आहे. २०१९ साली उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबरची युती तोडली तेव्हा शाह यांनी आपली फसवणूक केल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे शाह हे उद्धव ठाकरे यांच्यावर अजूनही नाराज आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे ही वाचा >> Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण?

भाजपाचा लक्ष्य निश्चित

बृहन्मुंबई महानगरपालिका ही गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शिवसेनेच्या (ठाकरे) ताब्यात आहे. मात्र, आता भाजपाला मुंबईवर आपला झेंडा फडकवायचा आहे. त्यासाठी भाजपाचे केंद्रीय नेतृत्व व राज्यभरातील नेते, त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुंबईत मोर्चेबांधणी करत आहे. पाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री व भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आगामी काळातील भाजपाच्या योजनांचा उल्लेख केला. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणे भाजपाचे प्रथम उद्दिष्ट असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. यावेळी ते कार्यकर्त्यांना म्हणाले, “कठोर परिश्रम, समर्पण व दृढनिश्चयाचा जोरावर आपण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकू”. लवकरच बृहन्मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

हे ही वाचा >> शिवसेना ठाकरे गटाचे नागपुरात स्वबळ किती? निष्ठावानांकडे कायम दुर्लक्ष केल्याने पक्षाची घसरण

अमित शाह यांची ठाकरे-पवारांवर शेलक्या शब्दांत टीका

शिर्डीमधील भाजपाच्या अधिवेशनात अमित शाह म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक विजयाचे अनेक अर्थ आहेत. महाराष्ट्राच्या विजयाने १९७८ पासून शरद पवारांनी जे दगाफटक्याचे जे राजकारण होते ते २० फूट गाडण्याचे काम केले. उद्धव ठाकरे यांनी आपल्याशी जो द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवून दिली आहे. १९७८ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु होते. ते जनतेने संपवून दाखवले”.

हे ही वाचा >> इंडिया आघाडी विसर्जित होणार? केजरीवालांना पाठिंबा देण्यावरून दोन गट; अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितले….

जुन्या मित्रांना दुरूनच नमस्कार

२०१९ च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या निवडणुकीत शिवसेना (संयुक्त) व भाजपा युतीला बहुमत मिळाले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबरची युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेसला आपल्याबरोबर घेत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. त्यानंतर अडीच वर्षांनी शिवसेना फुटली, एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना आपल्याबरोबर घेत वेगळा गट स्थापन केला व आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. त्यानंतर त्यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केलं. वर्षभराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील फुटला. शिंदेंच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवार ४१ आमदारांना आपल्याबरोबर घेऊन शिवसेना भाजपा युती सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर महाराष्ट्रात निवडणुकांच्या प्रचारकाळात अमित शाह यांनी प्रामुख्याने शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी हे आपले प्रमुख विरोधक असून या प्रतिस्पर्ध्यांना हरवणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे शाह यांनी सातत्याने आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले. त्यांची ती वक्तव्ये पाहून शाह हे त्यांच्या जुन्या मित्रांना पुन्हा जवळ करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचं स्पष्ट झालं. त्यांनी एक प्रकारे जुन्या मित्रांना दुरूनच नमस्कार केला आहे.

हे ही वाचा >> Sharad Pawar on RSS: शरद पवारांकडून RSS ची स्तुती; संघासारखे केडर निर्माण करण्याची गरज का व्यक्त केली?

शांहांच्या टीकेला सुळे व सावंतांकडून जशास तसं प्रत्युत्तर

शाह यांनी शिर्डी येथे पक्षाच्या अधिवेशनात शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांची हेडलाईन बनावे यासाठी शरद पवारांवर टीका केली जाते”, असे सुळे म्हणाल्या. तर, शिवसेनेचे (ठाकरे) खासदार अरविंद सावंत म्हणाले, “शाह हे स्वतः काही संत नाहीत आणि त्यांना अशा प्रकारची वक्तव्ये करण्याचा नैतिक अधिकार देखील नाही”.

Story img Loader