Amit Shah slams Sharad Pawar Uddhav Thackeray BJP Shirdi Convention : भारतीय जनता पार्टीच्या राज्यस्तरीय अधिवेशनात (शिर्डी) केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. या अधिवेशनात बोलताना शाह यांनी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख तथा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी शाह यांनी उद्धव ठाकरे यांचा गद्दार व बेईमान असा उल्लेख केला. तर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हेच खरे पक्ष असल्याचा पुनरुच्चार केला. अलीकडेच उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. तसेच, शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (भाजपाची मातृशाखा) कौतुक केले होते. त्यामुळे आता शरद पवार व उद्धव ठाकरे यांची भाजपाशी जवळीक वाढत आहे का? अशा स्वरूपाची चर्चा धीम्या आवाजात चालू असतानाच अमित शाह यांनी या दोन्ही पक्षांबद्दल व त्यांच्या प्रमुख नेत्यांबद्दलचा त्यांच्या मनातील संताप व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा