कन्याकुमारीतून सुरु झालेली ‘भारत जोडो’ यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये येऊन थांबली. रविवारी श्रीनगर येथे तिरंगा ध्वज फकडवून ‘भारत जोडो यात्रे’चा समारोप झाला. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात्रेबद्दल भाष्य केलं आहे. ‘भारत जोडो’ यात्रेचं नेतृत्व करणे हा जीवनातील सर्वात मोठा अनुभव होता. या यात्रेचा भारताच्या राजकारणावर प्रभाव पडणार, अस विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला.
यात्रेच्या समारोपानंतर राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा भाजपा काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचा दावा राहुल गांधींनी फेटाळून लावला. “जम्मू-काश्मीरमध्ये बॉम्बस्फोट होत असून, हत्या करण्यात येत आहेत. येथील परिस्थिती सामान्य असेल तर, भाजपाचे नेते जम्मू ते लाल चौक अशी यात्रा का काढत नाहीत? तसेच, अमित शाहांनी जम्मू ते काश्मीर चालत जावे,” असे आव्हान राहुल गांधींनी दिलं.
हेही वाचा : “विरोधकांच्या कोणत्याही आघाडीला तेव्हा अर्थ असतो जेव्हा काँग्रेस…” जयराम रमेश यांचं सूचक वक्तव्य!
देशातील विरोधकांमध्ये एकी असल्याचं दिसत नाही, या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले, “विरोधकांची एकजूट चर्चा आणि दृष्टीकोणातून होईल. विरोधकांमध्ये मतभेद आहेत. पण, ते एकत्र बसून चर्चा करतील आणि लढतील,” असं राहुल गांधींनी सांगितलं.
हेही वाचा : समाजवादी पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित, अखिलेश यादवांनी काका शिवपाल यादव यांना दिली मोठी जबाबदारी
‘भारत जोडो यात्रे’ला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल बोलताना राहुल गांधींनी म्हटलं, “भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ( आरएसएस ) देशाच्या संवैधानिक संस्थावर हल्ला करत आहेत. संसद, विधानसभा, न्यायव्यवस्था आणि माध्यमांवर हल्ले सुरु आहेत. संवैधानिक संस्थावर हल्ला होत असल्यानेच यात्रेला प्रतिसाद मिळाला,” असं राहुल गांधी म्हणाले.