सौरभ कुलश्रेष्ठ, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या नावाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मोठे वलय आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपापल्या परीने ठाकरे नावाचे वलय कायम राखले. पण भिन्न स्वभावाच्या या दोन चुलत भावांमध्ये एक गोष्ट समान; ती म्हणजे सातत्याने महाराष्ट्रात फिरून संपर्क कायम राखणे-वाढवण्याबाबत अनिच्छा. त्यामुळे पक्षाचे राजकीय भवितव्य संकटात आल्यानंतर मनविसेचे प्रमुख अमित राज ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य उद्धव ठाकरे यांचे गेल्या तीन महिन्यांतील महाराष्ट्राच्या विविध भागातील दौऱ्यावर दौरे पाहिले तर ‘पुत्र टाळती चूक पित्याची’ असे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आश्वासक वाटेल असे राजकीय चित्र समोर येत आहे.
हेही वाचा- पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेचे ‘मोठे मासे’ ‘बाळासाहेबांची शिवसेने’च्या गळाला?
पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी म्हण आहे. राजकारणात तर ते खूप महत्त्वाचे असते. तिकडे केवळ पुढच्यावर नव्हे तर आजूबाजूच्या लोकांवरही लक्ष ठेवावे लागते. त्यांना बसत असलेल्या ठेचांपासून योग्य तो बोध घेऊन शहाणे व्हावे लागते. इतकेच नव्हे तर आजूबाजूचे यशस्वी राजकारणी नेमके कशामुळे यशस्वी होत आहेत याचेही आकलन करून आपल्या राजकारणात तशी सुधारणा करावी लागते. पण सर्वांनाच ते जमते किंवा आवडते असे नाही. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या सर्व पक्षांचे नेते आपापल्या परीने सातत्याने दौरे करून राजकीय पातळीवर आणि मतदारांच्या पातळीवर जनसंपर्क वाढवत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार, भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पूर्वीचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे असे सातत्याने दौऱ्यावर असत. त्यातून या नेत्यांनी आपला पक्ष वाढवला शिवाय त्यांचे नेतृत्वही प्रस्थापित झाले. मात्र शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची पिढी असलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांना अशा राजकारणाबद्दल अनिच्छाच अधिक. लोकांनी आपल्याला महाराष्ट्रभरातून भेटायला मुंबईत यावे आणि आपण त्यांना हवे तेव्हा भेटावे अशीही दोघांची समान शैली. त्यातूनच ठाकरे यांचे राजकारण म्हणजे मधूनच एखादी सभा आणि कधीतरी एखादा दौरा असे ‘राजकीय इव्हेंट’चे राजकारण अशी चर्चा राजकीय वर्तुळात असते.
हेही वाचा- पक्षांतर्गत कोंडीमुळे अवधूत तटकरे यांनी शिवबंधन तोडले….
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील बंड आणि २०१४ नंतर निवडणुकीच्या राजकारणात प्रभावहीन झालेली मनसे यामागे लोकसंपर्कातील सातत्याचा अभाव हे कारण ठळकपणे मांडले गेले. गेल्या तीन महिन्यांतील अमित राज ठाकरे आणि आदित्य उद्धव ठाकरे यांचे दौरे पाहिले तर या भावांनी आपल्या वडिलांनी केलेल्या चुकीपासून योग्य बोध घेत ‘पुत्र टाळती चूक पित्याची’ असे राजकीय चित्र तयार करण्याचा निर्धार केलेला दिसतो.
अमित राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून सर्वप्रथम मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात दौरा केला. त्यानंतर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांत अमित ठाकरे पोहोचले. कोकण दौरा झाल्यानंतर काही दिवसांत लगेच ठाणे, नवी मुंबई, पालघर, भिवंडी, कल्याण- डोंबिवली, ढोलची अंबरनाथ -बदलापूर असा मुंबई महानगर प्रदेशातील भाग पिंजून काढला. नुकताच त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला. महत्त्वाचे म्हणजे या दौऱ्यात सभांमध्ये भाषणे ठोकण्यापेक्षा बैठका घेऊन वैयक्तिक संवादावर अमित ठाकरे यांनी भर दिला. काही अडचण असली की मला थेट संपर्क करा, भेटायचे असेल तर मुंबईत येऊन भेटा, लगेच वेळ दिली जाईल असे सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. तरुणींच्या छेडछाडीविरोधात मनविसे भूमिका घेणार असे जाहीर करत त्यांनी अत्यंत संवेदनशील अशा महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालत तरुणाईला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठवाड्यात लवकरच विधानसभा मतदारसंघनिहाय दौरा करणार असल्याचेही अमित ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
अमित राज ठाकरे यांच्या दौऱ्यांकडे बारकाईने पाहिले तर गेल्या तीन महिन्यांत त्यांनी मुंबई, मुंबई महानगर प्रदेश, कोकण आणि मराठवाडा या शिवसेनेचा प्रमुख राजकीय आधार असलेल्या भागांत लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. या भागातील तरुणाई शिवसेनाऐवजी मनसेकडे वळवण्याचा प्रयत्न ते अत्यंत चाणाक्षपणे करत आहेत. त्यातून यश किती मिळेल हा नंतरचा मुद्दा पण या दौऱ्यांमुळे मनसेची प्रतिमा बदलण्यास मदत होऊ शकते.
तिकडे शिवसेनेतील फुटीनंतर आदित्य उद्धव ठाकरे यांनीही पक्ष संघटना टिकवण्यासाठी आणि शिवसैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रा काढल्या. गेल्या तीन महिन्यांत आदित्य ठाकरे यांनी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाबरोबरच रायगड, रत्नागिरी, चिपळूण, दापोली, सिंधुदुर्ग असा कोकण आणि कोल्हापूर, सातारा, सांगली असा दौरा करत पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढला. त्याचबरोबर औरंगाबाद, नाशिकचा दौराही आदित्य ठाकरे यांनी केला. या दौऱ्यांमध्ये आदित्य ठाकरे यांना मिळालेला प्रतिसाद पाहून काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेतेही चकित झाले होते. या दोन्ही पक्षाच्या अनेक नेत्यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुकही केले. विविध विषयांचे आकलन आणि मुद्देसूद मांडणी हे आदित्य ठाकरे यांच्या भाषणाचे वैशिष्ट्य. कुठेही न अडखळता सलगपणे सहज सोपा संवाद साधणारे आदित्य ठाकरे शिवसैनिकांचे मनोबल टिकवण्यासाठी उपयुक्त ठरले.
हेही वाचा- मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत बच्चू कडू राजकीयदृष्ट्या हतबल
आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना व मनसेला राजकीय यश किती मिळेल यापेक्षा आदित्य उद्धव ठाकरे आणि अमित राज ठाकरे हे ठाकरे शैलीच्या राजकारणाचे प्रारूप बदलून आपल्याशी सातत्याने संवाद साधत आहेत. हेच मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आश्वासक वाटत आहे.