मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला त्याचे प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

वायकर यांची खासदारकी रद्द करण्याची आणि या मतदारसंघातून आपल्याला निर्वाचित उमेदवार घोषित करण्याची मागणी कीर्तिकर यांनी याचिकेद्वारे केली आहे. मतमोजणीच्या दिवशीच मतांमध्ये तफावत आढळून आल्याने पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून अनेक गंभीर त्रुटी झाल्या. त्याचा तसेच मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित नियमांचे उल्लंघन केले गेल्याने, ३३३ बनावट मतदारांनी केलेल्या मतदानाचाही निकालावर परिणाम झाला. निवडणूक अधिकाऱ्याने मनमानीपणे मतमोजणी करण्यात घाई केल्याचा दावाही कीर्तिकर यांनी याचिकेत केला आहे. त्याचप्रमाणे, याचिकेवरील सुनावणीच्या वेळी या मतदारसंघातील संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे चित्रीकरण सादर करण्याचे आदेश द्यावेच, अशी मागणी केली आहे.

Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Chandrakant Khaire On Shiv Sena Shinde group
Chandrakant Khaire : ‘शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपाल पदाची ऑफर’, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Rajul Patel join eknath Shinde Shiv Sena
Rajul Patel : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

हेही वाचा >>>मी पुन्हा विधान परिषदेत निवडून येईन शेकापचे जयंत पाटील यांचा निर्धार

कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव झाला होता. वायकर यांना ४ लाख ५२ हजार ६४४, तर कीर्तिकर यांना ४ लाख ५२ हजार ५९६ मते मिळाली होती. बऱ्याच गोंधळानंतर वायकर यांना विजयी उमेदवार घोषित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, वायकर यांच्या निवडणुकीविरोधात करण्यात आलेली ही दुसरी याचिका आहे.

Story img Loader