अमरावती : राज्‍याच्‍या स्‍थापनेपासून जिल्‍ह्याच्‍या राजकारणावर वर्चस्‍व ठेवून असलेल्‍या काँग्रेसचा यावेळी जिल्‍ह्यात प्रथमच एकही आमदार निवडून आलेला नाही. यावेळी काँग्रेसची एवढी वाताहत का झाली, हा प्रश्‍न चर्चेत आला आहे.

१९९० नंतर जिल्‍ह्यात काँग्रेसला पिछेहाटीला तोंड द्यावे लागले. १९८५ च्‍या निवडणुकीत जिल्‍ह्यातून काँग्रेसचे सात आमदार निवडून आले होते. १९९० च्‍या निवडणुकीत ही संख्‍या दोनवर आली. जिल्‍ह्यातून काँग्रेस हद्दपार होणार, असे त्‍यावेळी बोलले जात होते. भाजप आणि शिवसेनेने वर्चस्‍व निर्माण केले होते, पण त्‍यानंतरही २००४ पर्यंतच्‍या निवडणुकीत काँग्रेसचे दोन किंवा तीन आमदारांनी प्रतिनिधित्‍व करताना काँग्रेसची पक्षसंघटना जिवंत ठेवली होती. २००९ च्‍या निवडणुकीत मात्र काँग्रेसने पुन्‍हा उभारी घेतली आणि पक्षाचे चार आमदार निवडून आले. त्‍यात धामणगाव रेल्‍वे, तिवसा, मेळघाट आणि अमरावतीतून काँग्रेसला यश मिळाले. मध्‍यंतरीच्‍या काळात काँग्रेसचे नेतृत्‍व यशोमती ठाकूर आणि डॉ. सुनील देशमुख यांच्‍याकडे आले होते.
काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत स्‍पर्धा ही कायम चर्चेत राहिली. पण, लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी सर्व काँग्रेसजन हे एकत्रित आल्‍याचे चित्र दिसले. काँग्रेसचे बळवंत वानखडे हे निवडून आले. त्‍यांनी भाजपच्‍या नवनीत राणा यांना पराभूत करून जिल्‍ह्यात काँग्रेसचाच दबदबा आहे, हे दर्शवून दिले होते.

martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
police arrested the dumper owner in the wagholi accident case
पुणे : वाघोली अपघात प्रकरणात डंपर मालक अटकेत
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
injured young man share experience of dumper accident
पुणे : अचानक मोठ्या आवाजाने जाग आली आणि…, जखमी तरुणाचा अंगावर काटा आणणारा अनुभव
Vinod Kambli Reaction , Bhiwandi Hospital,
मी धावायला तयार.. रुग्णालयात उपचारासाठी दाखल विनोद कांबळी यांची पहिली प्रतिक्रिया
Pankaj bhoyar vidhan sabha
“आज जितक्या संघटना मंत्र्यांचा सत्कार करताहेत त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या असत्या तर…”, भाजप नेत्याच्या मनातले अखेर…
Will BJP win in Delhi this year Is the election challenging for AAP
दिल्लीत यंदा भाजपची बाजी? ‘आप’साठी निवडणूक आव्हानात्मक का?

हेही वाचा – भुजबळ यांना मराठा समाजाच्या नाराजीची बसली झळ

सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांमध्‍ये बळवंत वानखडे यांना मताधिक्‍य मिळाले होते. त्‍यापैकी दर्यापूर वगळता इतर तीनही ठिकाणी काँग्रेसला पराभवाचा हादरा बसला. त्‍याची नेमकी कारणे काय, याचे मंथन कार्यकर्त्‍यांमध्‍ये सुरू झाले असले, तरी जिल्‍ह्यात महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीप्रमाणे जिंकण्‍याच्‍या ईर्ष्‍येने लढली नाही, हा सूर उमटला आहे.

जिल्‍ह्यातील काँग्रेसचे चार दिग्‍गज नेते मैदानात होते. जिल्‍ह्याच्‍या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर या तीनवेळा निवडून आलेल्‍या. चौथ्‍यांदा मैदानात होत्‍या. पक्षसंघटनेची शक्‍ती त्‍यांच्‍या बाजूने असल्‍याने त्‍यांना पराभवाची भीती नाही, असे बोलले जात होते. पण, त्‍यांना धक्‍कादायक पराभव पत्‍करावा लागला. डॉ. सुनील देशमुख हे मुस्‍लीम मतांवर विसंबून होते. या मतांमध्‍ये मोठी विभागणी होऊन त्‍याचा मोठा फटका त्‍यांना बसला. अचलपूरमध्‍ये काँग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष बबलू देशमुख हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. हे त्‍यांचे सलग तिसरे अपयश ठरले. धामणगावमधून ज्‍येष्‍ठ नेते वीरेंद्र जगताप हे गेल्‍यावेळचा पराभव पुसू शकले नाहीत.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाचे ‘पानिपत’

भाजपने धार्मिक ध्रुवीकरणासोबत महायुती सरकारच्‍या योजनांच्या माध्‍यमातून जनाधार मिळवण्‍याचा प्रयत्‍न केला असताना काँग्रेस पक्ष त्‍याला प्रत्‍युत्‍तर देण्‍यात अपयशी ठरला. काँग्रेसमधील गटबाजी आणि महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांमधील विसंवाद यामुळे काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नाही. यातून पुन्‍हा उभारी घेण्‍याचे आव्‍हान काँग्रेससमोर आहे.

Story img Loader