अमरावती : मंत्रिमंडळाच्या रचनेनंतर बदलत्या राजकीय समीकरणाचे प्रतिबिंब येत्या काळात जिल्ह्यातील राजकारणावर उमटण्याचे संकेत आहेत. काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढून महायुतीने आपली स्थिती भक्कम केली असली, तरी महायुतीतील नेत्यांमध्ये असलेली कटुता, भाजपच्या गटा-तटातील अंतर्विरोध, राजकीय महत्वाकांक्षा या पार्श्वभूमीवर आगामी काळात महायुतीतच संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गेल्या दशकभरात प्रथमच अमरावती जिल्हा मंत्रिपदाविना आहे. २०१४ ते २०१९ या काळात विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे आणि डॉ. अनिल बोंडे यांना मंत्रिपद देण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये यशोमती ठाकूर यांना काँग्रेसकडून मंत्रिपद मिळाले, या तिघांनाही पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. प्रहारचे बच्चू कडू यांनाही मंत्रिपद मिळाले होते. पण हेच मंत्रिपद यशोमती ठाकूर, बच्चू कडू यांच्यासाठी शापित ठरले. दोघांनाही पराभवाचा हादरा बसला. आता जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच काँग्रेसचा एकही आमदार नाही. काँग्रेससमोर पुन्हा भरारी घेण्याचे आव्हान आहे.
हेही वाचा – गटबाजी, कुरघोडीच्या राजकारणामुळे मुनगंटीवार मंत्रिपदाला मुकले!
u
u
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खचलेल्या नवनीत राणा यांनी विधानसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा हाती घेतली. राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांची साथ त्यांना मिळाली. त्यांच्या नेतृत्वात भाजपचे पाच आमदार निवडून आले. ही भाजपची आजवरची सर्वोत्तम कामगिरी, पण मंत्रिमंडळात कुणालाही स्थान न मिळणे ही भाजपच्या एका गटासाठी निराशेची बाब ठरली.
युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. पण, यावेळीही त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पण, भाजपचा एक गट मात्र सुखावला आहे. प्रवीण पोटे आणि रवी राणा यांच्यातील गेल्या अनेक वर्षांतील कटुता अजूनही संपलेली नाही. रवी राणा यांनी पोटे यांचा उल्लेख ‘बालकमंत्री’ म्हणून केला होता, ही बाब पोटे समर्थक विसरलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीत हे द्वंद्व कायम होते. रवी राणा यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार जगदीश गुप्ता यांना उघड समर्थन दिले होते, तर प्रवीण पोटे यांनी महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुलभा खोडके यांच्यासाठी जोरदार प्रचार केला. भाजपमधील दोन गटातील दरी अधिकच रुंदावत चालली आहे.
जिल्ह्यात एकहाती वर्चस्व प्रस्थापित करू पाहणाऱ्या राणा दाम्पत्याला भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने सबुरीचा सल्ला दिला असला, तरी त्यांचा आक्रमक राजकारणाचा स्वभाव आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या काळात कोणते वळण घेईल, याची उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजय खोडके यांची भूमिका आगामी काळात महत्वाची ठरणार आहे. महापालिकेच्या राजकारणात त्यांच्या गटाचे वेगळे स्थान आहे. त्यांनी राजकीय चढउतार, खाचखळगे अनुभवले आहेत. त्यांची महायुतीच्या राजकारणातील भूमिका ही सावध असली, तरी राणा आणि खोडके हा संघर्ष महापालिका निवडणूक काळात अटळ मानला जात आहे. जगदीश गुप्ता यांचा गट कोणता निर्णय घेतो, याकडेही अनेकांचे लक्ष आहे.