अमरावती : विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होण्‍याचे संकेत मिळाले असताना राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उमेदवारीसाठी दोन्‍ही बाजूंनी दबावतंत्राचा वापर केला जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्‍सीखेचही सुरू झाली आहे. पक्षांतर्गत चढाओढीसोबतच महायुतीच्‍या घटक पक्षांनी आपल्‍या जागा मागणीच्‍या तलवारी उपसल्‍या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरीची लागण होणार हे निश्चित मानले जात आहे.

अमरावती जिल्‍ह्यात विधानसभेच्‍या ८ जागा आहेत. गेल्‍या निवडणुकीत तीन जागा काँग्रेसला दोन जागा प्रहार जनशक्‍ती पक्षाला, एक जागा भाजपला, एक जागा अपक्ष आणि एक जागा स्‍वाभिमानी पक्षाला मिळाली होती. राज्‍यात सत्‍तांतरानंतर बदलेल्‍या परिस्थितीत आता दोन जागा राष्‍ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहेत. दोन जागा काँग्रेसकडे, दोन जागा प्रहार जनशक्‍ती पक्ष आणि प्रत्‍येकी एक जागा ही भाजप तसेच युवा स्‍वाभिमान पक्षाकडे आहे.

evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
markadwadi villagers marathi news
मारकडवाडी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक, रामदास आठवले यांची भूमिका
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड
Maharashtra Assembly Elections 2024 Narendra Modi BJP MVA
‘गुजरात मॉडेल’चा महाराष्ट्रात पायरव…

हेही वाचा : हरियाणात भाजपाची वाट बिकट, उमेदवार यादी जाहीर होताच पक्षातील नेत्यांचे राजीनामे; काँग्रेस मारणार बाजी?

बडनेराचे आमदार रवी राणा यांचा युवा स्‍वाभिमान पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. त्‍यांच्‍या पत्‍नी माजी खासदार नवनीत राणा या भाजपमध्‍ये आहेत. मात्र रवी राणांनी आपण भाजपमध्‍ये प्रवेश करणार नसून युवा स्‍वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढणार असल्‍याची घोषणा केली आहे. बडनेरातून आता बाहेरचा लादलेला उमेदवार नको, अशी मागणी करून भाजपच्‍या पदाधिकाऱ्यांनी राणांच्‍या विरोधात भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत बडनेरा मतदार संघात नवनीत राणांना आघाडी मिळाली, ही भाजपमुळे मिळाली, त्‍यामुळे आता बडनेरातून कमळ चिन्‍हावर निवडणूक लढल्‍याय हमखास यश मिळेल, असा दावा भाजपच्‍या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्‍य आणि माजी नगरसेवक तुषार भारतीय, भाजपचे प्रदेश प्रवक्‍ते शिवराय कुळकर्णी, प्रदेश सचिव जयंत डेहणकर यांच्‍यासह अनेक नेते उमेदवारीसाठी इच्‍छूक आहेत. या ठिकाणाहून महायुतीत बंडखोरी अटळ मानली जात आहे.

मोर्शी मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीतही उमेदवारीवरून संघर्ष होण्‍याची शक्‍यता आहे. आमदार देवेंद्र भुयार यांची स्‍वाभिमानी पक्षातून हकालपट्टी झाल्‍यानंतर त्‍यांनी अजित पवार यांची साथ देण्‍याचा निर्णय घेतला. महायुतीत मोर्शी मतदारसंघ राष्‍ट्रवादी अजित पवार गटाला मिळावा, यासाठी खुद्द अजित पवार आग्रही आहेत. त्‍यामुळे भाजपमध्‍ये अस्‍वस्‍थता आहे. भाजपमधून खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्‍या पत्‍नी डॉ. वसुधा बोंडे, डॉ. अविनाश चौधरी, अर्चना मुरूमकर, नीलेश ठाकरे, मनोहर आंडे हे इच्‍छूक आहेत. महाविकास आघाडीतही स्‍पर्धा आहे. राष्‍ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी मंत्री आणि श्री शिवाजी शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि काँग्रेसतर्फे विक्रम ठाकरे हे इच्‍छूक आहेत.

हेही वाचा : निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा! केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे आश्वासन

अचलपूरचे प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू हे महायुतीत असले, तरी त्‍यांचा वेगळा सूर महायुतीसाठी अडचणीचा बनला आहे. भाजपने या मतदार संघातून तयारी केली आहे. भाजपमधून नंदू वासनकर, प्रवीण तायडे, सुधीर रसे हे स्‍पर्धेत आहेत. काँग्रेसमधून जिल्‍हाध्‍यक्ष बबलू देशमुख यांच्‍यासह काही नेते इच्‍छूक आहेत. या ठिकाणीही बंडखोरी होण्‍याची चिन्‍हे आहेत.

Story img Loader