मोहन अटाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नुकतेच राज्यसभेवर निवडून गेलेले भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडे आणि विधानपरिषद निवडणुकीतील भाजपचे उमेदवार श्रीकांत भारतीय यांच्या अमरावतीच्या राजकारणातील प्रवेशाने नाट्यमय घडामोडींचे संकेत मिळाले आहेत. भाजपमधील राणा दाम्पत्याच्या वाढत्या हस्तक्षेपाने त्रस्त असलेले वेगवेगळे गटही सुखावल्याचे चित्र आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला धामणगाव रेल्वे मतदार संघ वगळता कुठेही यश मिळू शकले नाही. हे शल्य भाजपच्या नेत्यांना आहे. जनाधार असूनही त्या संधीचे विजयात रूपांतर करण्यासाठी कुठेतरी कमी पडलो, त्यामुळे कामाला लागा असा संदेश विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना दिला आहे. भाजपला आता महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे. भाजपचे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख हे काँग्रेसमध्ये स्वगृही परतल्यानेही एक पोकळी निर्माण झाली होती. शहरात आणि जिल्ह्यात सक्षम असे नेतृत्व तयार व्हावे, यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनाच बळ देण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला. त्याचाच एक भाग म्हणून माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले, तर दुसरे अमरावतीकर नेते श्रीकांत भारतीय यांना विधान परिषदेत संधी देण्यात आली. हे करताना कुणबी-मराठा आणि ब्राह्मण अशा दोन्ही समाजातील नेत्यांना संधी देत सामाजिक-राजकीय संतुलन साधण्याचा प्रयत्न भाजपने केला.

या दोन शिलेदारांचे भाजपच्या वेगवेगळ्या गटांमध्ये कशा पद्धतीने स्वागत होते, याची राजकीय वर्तूळात उत्सुकता होती. भाजपमध्ये विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांचा एक गट आहे. फडणवीस सरकारच्या काळात शेवटच्या टप्प्यात मंत्रिपद गेल्यापासून ते दुखावले. पण, ते भाजपमध्ये सक्रिय राहिले. जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी-दिघडे, शहराध्यक्ष किरण पातुरकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, महापालिकेतील माजी सभागृह नेते तुषार भारतीय हे पक्षसंघटनेसाठी कार्य करताना दिसता आहेत. पण, आता नव्या बदलांमध्ये डॉ. बोंडे आणि श्रीकांत भारतीय यांचे नेतृत्व विविध गटांना स्वीकारावे लागणार आहे.

राष्ट्रपती निवडणुकीत मतांच्या जुळवाजुळवीसाठी राजनाथ सिंह यांच्या सोबतीला तावडे

मध्यंतरीच्या काळात बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातील वावर हा जिल्ह्यातील स्थानिक कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारा होता. रवी राणा यांच्यासोबत युती झाल्यास आपले काय होणार याचीही चिंता भाजप कार्यकर्त्यांना भेडसावत होती. आता डॉ. बोंडे आणि श्रीकांत भारतीय यांच्या प्रवेशाने राणा यांचा प्रभाव कमी होईल, अशी अपेक्षा भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना आहे.

रवी राणांशी केवळ सहकार्याचे संबंध – शिवराय कुळकर्णी

राणा दाम्पत्याने केंद्रात आणि राज्यात भाजपला पाठिंबा दिला आहे. तेवढेच सहकार्याचे संबंध त्यांच्यासोबत आहेत. रवी राणांच्या पक्षासोबत युती करण्याविषयी किंवा त्यांच्या भाजप प्रवेशाविषयी कुठल्याही सूचना नाहीत. भाजपचे कार्यकर्ते वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार स्वबळावर लढण्यास सक्षम आहेत. आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉ. बोंडे यांच्या नेतृत्वात पक्ष अधिक सुदृढ होईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी दिली.