अलिबाग – रायगड जिल्ह्यात बदलत्या राजकीय समीकरणामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांच्या महत्त्वाकांक्षा चांगल्याच वाढल्या आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

राज्यात महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर रायगडची लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जणार हे निश्चित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार सुनील तटकरे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने शिवसेनेला मतदारसंघ सोडावा लागणार होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अनंत गीते यांना निवृत्ती घेण्याचे संकेत दिले होते. श्रीवर्धन येथे शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर गीते यांना पक्षाच्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर जवळपास अडीच वर्षे गीते हे राजकीय अज्ञातवासात गेले होते. पण शिवसेनेतील बंडखोरीनंतर गीते यांचे पक्षातील वजन पुन्हा एकदा वाढले.

Vinayak Raut statement regarding those working against parties Ratnagiri news
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेईमान पदाधिका-यांवर कारवाई होणार; शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांची माहिती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?

हेही वाचा – अजित पवारांच्या खेळीने पुण्यात भाजपची कोंडी

रायगड जिल्ह्यातील तीन आमदार आणि पक्षपदाधिकाऱ्यांच्या बंडानंतर पक्षसंघटना सावरण्याची जबाबदारी पुन्हा एकदा गीते यांच्यावर सोपविण्यात आली. संघटना बांधणीसाठी त्यांनी नव्या राजकीय समिकरणांची चाचपणी सुरू केली. दुरावलेल्या शेकापला जवळ करण्याचा प्रयत्न केला. हे प्रयत्न सुरू असतानाच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. खासदार सुनील तटकरे आणि आमदार आदिती तटकरे हे अजित पवार यांच्या गटात दाखल होऊन, सत्ताधारी झाले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलली. यामुळे गीतेच्या महत्त्वाकांक्षा पुन्हा एकदा वाढल्या.

खासदार सुनील तटकरे हे आता महाविकास आघाडीत नसल्याने, गीतेंच्या मार्गातील मोठा अडसर दूर झाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून रायगड लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा दावा सांगितला आहे. अनंत गीते यांनी आपणच या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – अमरावतीमध्ये भाजपचे तळ्यात-मळ्यात

शेकापची साथ ही गीते यांच्यासाठी जमेची बाजू असली तरी, शिवसेनेमधील फूट अडचणीची ठरणार आहे. जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला फारसे स्थान राहिलेले नाही. त्यामुळे त्या पक्षाची फारशी मदत होणार नाही. काँग्रेसकडून मावळ अथवा रायगडचा मतदारसंघ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत गीते यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीपर्यंतची त्यांची वाटचाल सोपी नसणार हे निश्चित.

Story img Loader