मधु कांबळे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महाराष्ट्रातील भविष्यातील राजकारणाला वेगळे वळण मिळू पाहणाऱ्या विधानसभेच्या मुंबईतील एका मतदारसंघातील पोट निवडणुकीत अंतर्गत काहीशी धुसफूस असतानाही काँग्रेसने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. शिवसेनेने या आधी झालेल्या दोन पोट निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघावर पाणी सोडून काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपविरोधातील थेट लढतीत काँग्रेसला विजय मिळाला आणि विधानसभेतील त्यांचे संख्याबळ कायम राहिले. त्यामुळे काँग्रेसलाही आता अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणे अपरिहार्य ठरले आहे.
हेही वाचा : पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?
शिवसेनेशी हातमिळवणी करून काँग्रेसने राज्याच्या सत्तेत सहभाग मिळविला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे राज्यात महाविकास आघाडी म्हणून सरकार अस्तित्वात आले. तिन्ही पक्षांचा एक समान उद्देश होता तो म्हणजे भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे, ते त्यांचे डावपेच यशस्वी झाले. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर विधानसभेच्या तीन मतदारसंघात पोट निवडणुका झाल्या. २०१९ च्या निवडणुकीत पंढरपूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत भालके यांनी जिंकली होती, परंतु पुढे त्यांचे निधन झाल्यामुळे तेथे पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादीलाच ही जागा सोडण्यात आली, त्यांना शिवसेना व काँग्रेसने पाठिंबा दिला. परंतु भाजपने ही जागा जिंकली.
हेही वाचा : निवडणूक आयोगाने प्रथा-परंपरा मोडली ; एकाच वेळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे टाळले
त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील देगलुर मतदारसंघातही काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली. २०१९ च्या निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत झाली होती. त्यावेळी काँग्रेसचे अंतापूरकर विजयी झाले होते व शिवसेनेचे सुभाष साबणे पराभूत झाले होते. मात्र दोघांच्या मतांमध्ये १३ हजारांचा फरक होता. काँग्रेस आमदाराच्या निधनामुळे तेथे पोट निवडणूक झाली, त्यावेळी शिवसेनेने त्या मतदारसंघातील दावा सोडला व काँग्रेसला पाठिंबा दिला. महाविकास आघाडी म्हणूनच ही निवडणूक लढविण्यात आली, त्यामुळे काँग्रेसचा विजय झाला व भाजपचा पराजय.
हेही वाचा : ऋतुजा लटके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते मैदानात उतरणार
पुढे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतही शिवेसनेने काँग्रेसला पाठिंबा दिला. २०१९ च्या निवडणुकीत या मतदारसंघातही काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना झाला होता. त्यावेळी काँग्रेसला विजय मिळाला आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर पराभूत झाले होते. मात्र महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर जो मतदारसंघ ज्या पक्षाने जिंकला आहे, तो मतदारसंघ त्याच पक्षाला सोडण्याचे तिन्ही पक्षांनी राजकीय सूत्र ठरविले. त्याच आधारावर अंधेरी पूर्व मतदारसंघात २००४ व २००९ असे सलग दोनवेळा काँग्रेसचे सुरेश शेट्टी विजयी झाले होते, मात्र २०१४ व २०१९ मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे आता ३ नोव्हेंबरला या मतदारसंघात पोट निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा काँग्रेसचे मुंबईत अजूनही पक्षसंघटन मजबूत आहे. तरीही काँग्रेसने आघाडी धर्माला जागून शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीची ही सुरुवात असल्याचे मानले जात आहे.